सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"?
सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"? (प्रत्येक ग्रुपमधल्या मनमिळावूपणाची आणि मत व मनभेदाची सत्यकथा) Sunil Pune TM "गृप" हा शब्द खूप सामान्य वाटतो, पण त्यामागचं जग मात्र खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असतं. सुरुवात होते ती केवळ ३–४ जिवलग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन गप्पा मारायच्या, आठवड्यातून एकदा भेटायचं, वाढदिवस, सण साजरे करायचे असा एक सकारात्मक, मनाला समाधान देणारा हेतू घेऊनच, पण जसजसं सदस्यसंख्येचं प्रमाण वाढत जातं, तसतसे विचारांचे, दृष्टिकोनांचे, स्वभावांचे फरक समोर यायला लागतात. ज्यांनी गृप सुरू केला, त्यांची एकत्रित भावना, मैत्रीचा ओलावा काहीसा विरून जातो..याच प्रक्रियेला मी "गृपारिझम" असं नाव देतो जिथे "गृप" हा शब्द फक्त नावापुरता राहतो आणि "इझम" म्हणजे एक विचारधारा, एक कल, एक वेगळं वळण घेण्याची सुरुवात होते. गृपारिझमची लक्षणं काय? गृपामध्ये जेव्हा सदस्यांच्या भावना, मतं, अपेक्षा यांचं टकराव होतो, तेव्हा गैरसमजांचं वावटळ सुरू होतं. कोणी कोणावर काही बोललं, कोणाचं रिप्लाय न आला, कोणाच्या जोकला हसावं का रागवावं... हे सगळं एकमेकांबद्दल...