हॅल्लो ! आजच्या डिजिटल युगात, "तुम्ही खरोखर श्रीमंत आहात का?" तपासून बघा.

*हॅल्लो ! आजच्या डिजिटल युगात, "तुम्ही खरोखर श्रीमंत आहात का?" तपासून बघा..*
(लेखक: Sunil Pune TM 8007939422)

श्रीमंती म्हणजे काय? लाखों-करोडो रूपयाचे बॅलन्स असलेली बँक खाती? एसी गाड्या, आलिशान बंगले, नोकर-चाकर, परदेशवारी, दर पावला गणिक मिळणारी वाह वाह ? खरंच, श्रीमंतीचं मोजमाप एवढंच असतं का?

माझ्या महाविद्यालयाच्या काळातील एक साधा पण एक विलक्षण विचार देणारा अनुभव मला आजही आठवतो. आमच्या एका  प्राध्यापकांनी वर्गात एक फार वेगळाच प्रश्न विचारला तो असा की, 
“शून्य 0 म्हणजे काय? (इंफिनिटी) अनंत म्हणजे काय? आणि हे दोघं कधी सारखे होऊ शकतात का?”

सगळा वर्ग चमकला. काहींनी लगेच उत्तरं दिली ती अशी, शून्य म्हणजे काहीही नाही आणि अनंत (इंफिनिटी) म्हणजे मोजता न येणारी एक मोठी संख्या असते....प्राध्यापक थोडं हसले आणि म्हणाले,
“शून्य म्हणजे ‘फार थोडं’ आणि (इंफिनिटी) अनंत म्हणजे ‘फार जास्त’. पण हे दोघं एकाच वेळी कसे असू शकतात हे समजून घ्या.”

त्यांनी एक गोष्ट सांगितली ती अशी,  एका अशिक्षित गुराख्याला मोजता येतं फक्त वीसपर्यंत. जर त्याच्या कळपात ५, १०, १५ मेंढ्या असतील तर तो नेमका आकडा सांगतो. पण जर त्या २५, ३० झाल्या, तर तो फक्त म्हणतो, “खूप झाल्या.” त्याच्या दृष्टिकोनातून २१ म्हणजे अनंत.
त्याचप्रमाणे, जर पृथ्वीचा व्यास आणि सूर्याच्या अंतराची तुलना केली, तर पृथ्वीचा आकार ‘शून्य’ वाटतो...पण जर पृथ्वीचा व्यासाची तुलना क्रिकेटच्या चेंडूशी केली, तर ही पृथ्वी अनंत (इंफिनिटी) ऐव्हडी व्यासाने मोठी वाटले ...हे ऐकून आम्हा सगळ्यांना एकच साक्षात्कार झाला की  "दृष्टिकोनावरून शून्य आणि इंफिनिटी ठरते !" म्हणजेच, श्रीमंतीसुद्धा ही ‘तुलनेची गोष्ट’ आहे.


श्रीमंतीचा खरा अर्थ काय...

आजकालच्या जगात आपल्याकडे असलेल्या वस्तूंपेक्षा, आपल्याला हवे असलेल्या वस्तूंची संख्या अधिक आहे. मोबाईल आहे पण नवीन हवा; घर आहे पण मोठं हवं; काम आहे पण पगार कमी वाटतो; सुट्टी आहे पण समाधान नाही!

म्हणूनच, खऱ्या अर्थाने श्रीमंत कोण असतो? तर ज्याचे उत्पन्नं हे त्याच्या गरजांपेक्षा अधिक असते, तो खरा श्रीमंत!
आणि ज्याच्या गरजा उत्पन्नापेक्षा अधिक आहेत तोच खरा गरीब असतो ! हे सूत्र आपण सदैव लक्षात ठेवावे .

आज प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारावा...
“माझं उत्पन्न कमी आहे की माझ्या गरजा जास्त आहेत ?”

गरजांचा फेरविचार करा कारण..आपणास जगण्यासाठी किती गोष्टींची गरज आहे? तर एक निवारा, थोडं अन्न, थोडं प्रेम, थोडं समाधान आणि उत्तम आरोग्य, या पाच गोष्टी मिळाल्या की माणूस मानसिकदृष्ट्या समृद्ध असतो. पण याच गोष्टी आज आपण विसरतो आहोत. आपण केवळ इतरांशी तुलना करत जगत आहोत.
फेसबुक, इंस्टाग्रामवर दुसऱ्यांचे फोटो पाहून आपली समाधानी झोप उडते. कारण ते जगत असलेलं आयुष्य आपल्याला हवं असतं, पण त्यामागचं परिश्रम, त्याग, किंवा नशिबाचा भाग आपल्याला माहीत नसतो म्हणून श्रीमंती म्हणजे आत्मिक समाधान आहे.

“मी श्रीमंत झालोय, कारण मी माझ्या हौशी कमी केल्या.” हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे.
तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्यात तुम्ही समाधान मानता का हे महत्त्वाचं आहे.

एक साधा माणूस, जो कुटुंबासोबत संध्याकाळी शांतपणे जेवतो, आठवड्याला एक दिवस मित्रांबरोबर गप्पा मारतो, दिवसभर प्रामाणिकपणे काम करतो आणि रात्री शांत झोपतो, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कारण त्याचं आयुष्य समतोल आहे.

आजच्या काळात आपण सर्वांनीच श्रीमंतीच्या व्याख्या बदलायला हव्यात..त्या अश्या...
श्रीमंत तो नाही जो गाडी बदलतो,....श्रीमंत तो आहे जो विचार बदलतो....श्रीमंत तो नाही जो बँकेत पैसे साठवतो,....श्रीमंत तो आहे जो नात्यात विश्वास आणि प्रेम साठवतो...श्रीमंत तो नाही जो मोठं घर घेतो,
श्रीमंत तो आहे जो घरात हास्य आणि समाधान आणतो.

जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचंय तर...तुमच्या गरजा तपासा त्या तुम्हाला गरज म्हणून आहेत की हव्यास म्हणून ? आणि प्रथम तुलना करणे थांबवा प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे त्यामुळेच कृतज्ञतेचा सराव करा जे आहे त्यात समाधान मानायला शिका.

शून्य आणि अनंत या दोन्ही कल्पना तुलनात्मक आहेत.
त्याचप्रमाणे, श्रीमंती आणि दारिद्र्यही केवळ तुलना आणि दृष्टीकोनावर आधारित आहेत. आपली मूल्यं, गरजा, आणि समाधानाचा आधार जर योग्य असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीत खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊ शकतो.

मी स्वतःला श्रीमंत मानतो कारण, माझ्या गरजा अत्यंत मर्यादित आहेत आणि समाधान खूप मोठं आहे....ज्याच्या आयुष्यात चांगले विचार, चांगली माणसं, प्रेमळ नाती आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे, तोच खरा श्रीमंत आहे...आपण सर्वजण आयुष्यात श्रीमंत व्हावं, पण ते पैशांनी नव्हे तर विचारांनी, कृतींनी आणि प्रेमाने,  हीच सदिच्छा!

(लेखक: Sunil Pune TM)
(Jury, Photography Trainer, Motivator & Life Thinker)
8007939422, 9359850065

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"