*"स्त्रीने स्वतःसाठी तरी थोडं थांबायलाच हवं..."*

*"स्त्रीने स्वतःसाठी तरी थोडं थांबायलाच हवं..."*
सुनिल पुणेTM 8007938422

स्त्री... एक अशी व्यक्तीजी आपल्या कुटुंबासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासर-मायकेसाठी, समाजासाठी सतत झटत असते. पण या धावपळीत ती स्वतःसाठी थांबत नाही... स्वतःच्या शरीराच्या गरजा, मनाच्या भावना, आपल्या लाडाची इच्छाही ती गिळून टाकते.

ती फक्त "देणारी" होते... पण "घेणारी" मात्र कधीच होत नाही.

विचार करा एकदा...
जर झाडालाच वेळेवर पाणी, खत, काळजी दिली नाही, तर ते झाड फुलणार कसं? तसंच, जर स्त्रीने स्वतःचं आरोग्य, मानसिक शांती, मनाचे हक्काचे विचार, आणि शरीराच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष केलं, तर ती कशी ताजीतवानी आणि आनंदी राहील?

आज अनेक स्त्रिया जीवनाच्या तणावात, थकव्याने, मानसिक ओझ्याने, आजाराने ग्रासलेल्या दिसतात. कारण त्या सतत "सगळ्यांकरता" झटतात... पण स्वतःसाठी नाही!

मग होतं काय?
डॉक्टर, टेस्ट्स, औषधं, हॉस्पिटल्स यांचा जीवनात शिरकाव होतो. मग ती 'सर्वांच्या आधारस्तंभ' स्त्री हळूहळू 'सर्वांची काळजीची जबाबदारी' बनते.

या अवस्थेवर उपाय काय? तर..

स्वतःसाठी थोडं थांबा!

तुमच्या मनाच्या भावना व्यक्त करा.

तुमच्या शरिराच्या गरजा, इच्छा, लाड त्यांना दाबून ठेऊ नका.

आपल्या शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. वेळच्यावेळी विश्रांती, व्यायाम, पोषण, आनंद, संवाद आणि स्वतःवर प्रेम करत जगा, या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत जितक्या तुम्ही इतरांसाठी देतात त्या गोष्टी पण स्वतःला द्या, वेळ द्या, स्वतःशी बोला, स्वतःचे ऐका....तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. ते "फक्त झगडण्याचं" नसावं, तर "मनसोक्त जगण्याचं" असावं. जेव्हा स्त्री स्वतःला जपते, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने इतरांना आधार देऊ शकते.

"स्वतःवर प्रेम करा, हेच जीवनाचं सर्वोच्च औषध आहे."
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...