सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"?
सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"?
(प्रत्येक ग्रुपमधल्या मनमिळावूपणाची आणि मत व मनभेदाची सत्यकथा) Sunil Pune TM
"गृप" हा शब्द खूप सामान्य वाटतो, पण त्यामागचं जग मात्र खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असतं. सुरुवात होते ती केवळ ३–४ जिवलग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन गप्पा मारायच्या, आठवड्यातून एकदा भेटायचं, वाढदिवस, सण साजरे करायचे असा एक सकारात्मक, मनाला समाधान देणारा हेतू घेऊनच,
पण जसजसं सदस्यसंख्येचं प्रमाण वाढत जातं, तसतसे विचारांचे, दृष्टिकोनांचे, स्वभावांचे फरक समोर यायला लागतात. ज्यांनी गृप सुरू केला, त्यांची एकत्रित भावना, मैत्रीचा ओलावा काहीसा विरून जातो..याच प्रक्रियेला मी "गृपारिझम" असं नाव देतो जिथे "गृप" हा शब्द फक्त नावापुरता राहतो आणि "इझम" म्हणजे एक विचारधारा, एक कल, एक वेगळं वळण घेण्याची सुरुवात होते.
गृपारिझमची लक्षणं काय?
गृपामध्ये जेव्हा सदस्यांच्या भावना, मतं, अपेक्षा यांचं टकराव होतो, तेव्हा गैरसमजांचं वावटळ सुरू होतं. कोणी कोणावर काही बोललं, कोणाचं रिप्लाय न आला, कोणाच्या जोकला हसावं का रागवावं... हे सगळं एकमेकांबद्दलच्या श्रद्धेला गालबोट लावायला लागतं.
कोणतीही छोटी गोष्ट, जसे
"त्याने तिला रिप्लाय का दिला?"
"तीने त्याला ओळख दाखवली, मला नाही!"
"ह्यानं हे पोस्ट टाकलं, पण माझ्या शुभेच्छा विसरला!"
हे सगळं एक अनावश्यक नकारात्मकतेचं वातावरण तयार करतं.
सर्वात मोठा बळी कोण होतो? तो म्हणजे "अॅडमिन"
जो हा ग्रुप प्रेमाने, एकत्रितपणाच्या हेतूने बनवतो.
सर्वांच्या भावना सांभाळतो, अपडेट देतो, चांगले विचार शेअर करतो, वेळ देतो…
पण त्याच्यावरच चुकांचं खापर फुटतं! त्याला न विचारता निर्णय घेणारा म्हणतात,
तर कधी प्रत्येक गोष्टीत मधे पडणारा!
त्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह लावलं जातं.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात हे मान्य करूनच गृपमध्ये वावरावं.
थोडी संयमाची, समजूतदारपणाची गरज प्रत्येकाने पाळायला हवी. काही गोष्टींची उत्तरं देण्यात काही वेळ लागला तर ते स्वाभाविक आहे...विनोद, संवाद आणि शंका हे सर्व मर्यादेतच हवेत.
एकंदरीत, ग्रुप हा "गट" नव्हे, तो "समूह" असावा
जिथे संवाद असेल, समजूत असेल, सन्मान असेल. अशा गृपातील मैत्री ही आयुष्यभराची ठेव असते.
कुठल्याही नकारात्मकतेपेक्षा ही ठेव जपणं अधिक महत्त्वाचं!
शेवटी एकच नम्र विनंती आपण सर्वांनी एकमेकांचा आदर करत, समजून घेत, काही चुका दुर्लक्षित करत, हा मैत्रीचा प्रवास आनंददायक करायला हवा.
सर्व अॅडमिन सदस्यांना मनःपूर्वक सलाम!
जे निस्वार्थीपणे सर्व गृपसदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी सतत कार्यरत असतात.
जर हा लेख तुम्हाला योग्य वाटला,
तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
समजूत, संयम आणि संवाद हीच गृपची खरी ताकद आहे!
Sunil Pune TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment