"काळाच्या उन्हात पोसलेली स्त्री खरंच अनमोल असते…"
"काळाच्या उन्हात पोसलेली स्त्री खरंच अनमोल असते…" सुनिल पुणेTM 8007939422
जशी आगीच्या झळांतून द्राक्ष सुकून किशमिश होते,
तशीच स्त्री ही अनुभवांच्या वाळवंटातून जाऊन अधिक मोलाची होते.
मातीला आकार दिला, तापवून मडके बनवलं जाते,
तसंच स्त्रीही जीवनाच्या आगीत तापून
घराची सुखद सावली बनते.
ती जन्मते जेव्हा मुलगी म्हणून,
मनात स्वप्नं, डोळ्यांत चमक घेऊन.
नंतर सून होते, पत्नी होते, आई होते, आणि या सगळ्या भूमिकांमध्ये ती स्वतःला हरवून घेते, पण इतरांना सावरण्यात ती धन्यता मानते.
तीच्या डोळ्यांत अश्रू असले तरी चेहऱ्यावर हास्य असतं.
ती थकते, पण थांबत नाही.
ती झिजते, पण तक्रार करत नाही. ती मोडते ही, पण पुन्हा उभी राहते.
स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या रूपात नाही,
तर तिच्या सहनशीलतेत आहे,
तिच्या समजूतदारपणात आहे,
आणि काळाच्या कसोटीत तावून सुलाखून निघालेल्या तिच्या अस्तित्वात असतं.
जशी मातीचे मडकं होते तेव्हा पाणी साठवते,
तशीच स्त्रीही आठवणी, भावना आणि कष्ट साठवते सगळ्यांसाठी.
तिच्यावर कधी टीका होते, अपेक्षा ही लादल्या जातात,
पण तरीही ती घराचा आधार बनून उभीच राहते.
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून
इतरांसाठी हसणारी प्रत्येक स्त्री खरंच अनमोल श्रेष्ट असते. हिरकणीस प्रणाम...
कारण आगीच्या, वेळेच्या, दुखाच्या झळांनी पोसलेली गोष्ट
नेहमीच जास्त मौल्यवान असते…
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment