"स्त्री" नशिबवान पुरुषाच्या जीवनातली हिरकणीचे वरदान असते........
"स्त्री" नशिबवान पुरुषाच्या जीवनातली हिरकणीचे वरदान असते.............. सुनिल पुणेTM 8007939422
पुरुषाच्या आयुष्यात जर एक प्रामाणिक, प्रेमळ, समजूतदार अशी हिरकणी स्त्री नशिबाने आली, तर ते केवळ नातं राहत नाही, ते एक ईश्वरी देणगी ठरतं. ही स्त्री केवळ जोडीदार नसते, ती जीवनदायिनी शक्ती असते. तिच्या अस्तित्वामुळे पुरुषाचं आयुष्य एका वेगळ्याच प्रकाशमान मार्गावर प्रवास करतं. ही स्त्री त्याला समजून घेते, आधार देते, प्रत्येक वळणावर विश्वासाने त्याचा हात धरते.
आजच्या धावपळीच्या, मतलबी आणि गोंधळलेल्या जगात जर अशी स्त्री आयुष्यात आली, तर ती केवळ सुंदर शरीर नसून सुंदर मनाचं, नितळ प्रेमाचं, समर्पणाचं प्रतिबिंब असते. ती पुरुषाच्या स्वप्नांना बळ देते, त्याच्या अपयशाच्या क्षणी डोळे पुसते, आणि त्याच्या यशात फुलांइतकी हसते.
प्रेमाने भरलेली साथ मिळाल्यावर जग जिंकायला किती वेळ लागतो हो? काही दिवसांत पुरुषाचं जीवनच बदलतं. जीवनातील कपड्यापासून विचारांपर्यंत, हृदयापासून धनसंपत्तीपर्यंत हे सगळं उजळून निघतं. कारण ही स्त्री फक्त जोडीदार नाही, ती त्याची प्रेरणा असते, गुरु असते, जीवनाची दिशा दाखवणारी दीपस्तंभ असते.
आजकाल अनेक पुरुष स्त्रीकडे केवळ आकर्षणाच्या नजरेने पाहतात, पण जरा तिच्या अंतरंगात डोकवा. ती किती प्रेमाने तुमचं स्वप्न पेरते, तुमच्यावर श्रद्धा ठेवते, तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत सामील होते. तिच्या डोळ्यांत तुमच्यासाठी एक वेगळीच मायाळू भावना असते जी कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही.
आणि..
जर अशी अप्सरा तुमच्या जीवनात आली असेल तर, तिला ‘आपली’ म्हणताना स्वार्थ नव्हे तर कृतज्ञतेने सांगा. तिच्या अस्तित्वाचा आदर करा, तिच्या मनाला समजून घ्या, तिच्या प्रत्येक निःशब्द वेदनांमध्ये सहभागी व्हा...तिला "सतत मिळालेली नाही, पण देवाने खास वेळेस पाठवलेली आहे" असं समजून तिचं मन जपा. कारण हीच स्त्री, तुमचं आयुष्य संपूर्ण करते. तुमचा चेहरा फुलवते, तुमची प्रगती गतीने घडवते, आणि तुमचं आयुष्य समृद्ध, शांत, आणि पूर्ण करते....स्त्रीला जपा, ओळखा, आणि मनापासून आदर करा…कारण एक खरी स्त्री आयुष्यात आली, की आयुष्य सोनं होतं… प्रेमाने भरतं…आणि तुमचं जग ‘स्वर्ग’ होतं…
लेखक: सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
सखोल अनुभवातून उतरलेली मनोगत
Comments
Post a Comment