लग्न करतांना काळा नवरा करावा, कारण डिजिटल युगातील गोऱ्या नव वधूंसाठी खास सुचना!
लग्न करतांना काळा नवरा करावा, कारण डिजिटल युगातील गोऱ्या नव वधूंसाठी खास सुचना!
लेखक: सुनिल पुणे TM 9359850065
पूर्वीच्या काळी मुलींसाठी नवरा शोधताना विचारायचं, "सरकारी नोकरी आहे का?"
आजच्या डिजिटल युगात विचारलं जातं की "नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर कराल का?"
पण या सगळ्या प्रश्नांपेक्षा एक प्रश्न जरा जास्त महत्त्वाचा आहे…तो म्हणजे...
"नवर्याचा रंग किती काळा आहे?"
हो हो, चुकूनसुद्धा हसू नका!
हे नवीन संशोधन माझे आहे सुनिल पुणेTM चे, "काळा नवरा = सुरक्षित संसार !"
जेव्हडा काळा नवरा असेल तर सुखी संसार कसा ? यामध्ये काय संबंध आहे ? तर
काळ्या नवर्याला इतर पोरी व बायका भाव देत नाहीच आणि बिचारा नवरा आपल्या सुदर्शन गोऱ्या बायकोच्या प्रेमात इतका गढून जातो की.
स्वतःचं पावित्र्य तो Google Drive सारखं लॉक करून ठेवतो!
त्यामुळे कुठलीही पोरगी त्याला “Hi” म्हटलं तरी तो बिचारा “Hi BP?” समजतो!
इन्स्टाग्राम फेमिनिस्ट नाहीतर ‘Reel Queen’ पोरींच्या जाळ्यात हे नवरे कधीच अडकतच नाहीत....त्यांना माहीत असतं, आपण जर कुठे "heart react" केलं, तर बायकोचा slipper reaction लगेच येते !
काळ्या नवऱ्यांच्या खास गोष्टी अश्या....तो दिवसभर व्हॉट्सअॅपवर "बायको" कडेच हजेरी लावतो....तो सिनेमात नायिकेला बघूनही म्हणतो, "आपलीच बायको. तिच्यापेक्षा सुंदर!"...बायकोने जर विचारलं, "मी जाड दिसते का?"
तर हा काळा नवरा एकदम छान उत्तर देतो,
"तुला काय हायफाय filter ची गरज आहे का गं?"
नवीन वधूंसाठी एक सुचना:
पती पसंत करायला रंग बघा, जितका रंग काळा, तितका पती सच्चा!...फोटोवर जाऊ नका, बायकोवर लक्ष केंद्रित करणारा नवरा कधी ही हँडसमच दिसतो...काळा नवर्याच्या मोबाईलमध्ये पासवर्ड असतो, पण तो बायकोला पण माहित असतो!
काही काळ्या नवर्यांचे WhatsApp स्टेटस:
"बायको = WiFi Password… जगाचं इंटरनेट चालतं तिच्याच मुळे!"
"Dark & Lovely, मी बायकोसाठी only!"
"संसारात Loyalty पाहिजे, Fairness नाही!"
मी शेवटचं मनापासून सांगतो की, जगातले सगळ्यात प्रामाणिक नवरे हे थोडेसे काळे, टकले आणि प्रेमळ असतात!
त्यांच्या काळ्या रंगामागे आईची सत्वशील संस्कार आणि बायकोचं 24x7 लक्ष असतं! म्हणूनच,
नवीन वधूंनो, "Tall, Dark & Handsome" सोडून,
"Short, Dark & Loyal" नवऱ्याला पसंती द्या…
संसार हमखास टिकेल!"
(हसत-हसत संसार करा, पण काळ्या नवऱ्याला मात्र जपून ठेवा कारण,
Digital काळात हाच खरा Diamond आहे!)
© सुनिल पुणेTM 8007939422, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment