"प्रेमाचं वय नसतं… काळ ठरवतो कोण येईल आपल्या आयुष्यात!"
*"प्रेमाचं वय नसतं… काळ ठरवतो कोण येईल आपल्या आयुष्यात!"* सुनिल पुणे TM 9359850065
वय कितीही असो, प्रेमाला त्याचं बंधन कधीच नसतं…
कधी कोणी आपल्या हृदयात जागा कशी बनवतं, हे आपणही ओळखत नाही ते काळ ठरवतो.
जात, पात, धर्म, पैसा किंवा वय या गोष्टी प्रेमात आड येतीलच असं नाही.
बघा ना फिल्म इंडस्ट्री किंवा क्रिकेटमधील काही जोड्यांकडे
वयाचं अंतर खूप असूनही त्यांचं प्रेम फुललेलं आहे… टिकलेलं आहे…
कारण प्रेम हे आकड्यांत मोजायचं नसतं ते मनामनांत उमलतं!
आपण लहानपणापासून ऐकत आलोय
"प्रेमात सर्व माफ असतं!"
पण खरंतर प्रेम टिकवायचं कसं, जपायचं कसं
ही खरी कसोटी असते दोघांची.
प्रेमात समज, संवाद, समर्पण आणि विश्वास असतो,
आणि हेच घटक एक सुंदर नातं घडवतात.
आजचं वास्तव सांगतं
प्रेमाला वयाचं बंधन नाही, फक्त मनं जुळणं गरजेचं!
तुमच्या प्रेमकहाणीला प्रणाम…!
सुनिल पुणेTM 8007939422. sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment