"पुरुषाचं मोल केवळ पैशातच का?"

"पुरुषाचं मोल केवळ पैशातच का?" लेखक  Sunil Pune TM 9359850065

आजच्या घडीला समाजात एक स्पष्ट, पण न बोललेलं वास्तव दिसतं की, पुरुषाची किंमत ठरते ती त्याने किती पैसे कमावले यावरून व तो मुलगा किती मोठ्या पगाराच्या नोकरीत आहे, त्याचा व्यवसाय किती मोठा आहे, त्याच्या बँक खात्यात किती शिल्लक आहेत, हेच निकष त्याच्या प्रतिष्ठेचे आणि आदराचे बनतात.

लग्नाचं उदाहरण घ्या. आजही अनेक घरांत मुलीच्या नातेवाईकांचा पहिला प्रश्न असतो, "मुलगा किती कमावतो?" त्याच्या स्वभावापेक्षा, विचारांपेक्षा, माणूस म्हणून त्याच्या गुणांपेक्षा महत्व दिलं जातं त्याच्या पगाराला. हाच दृष्टिकोन मग मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि कुटुंबातही दिसतो, जो जास्त पैसे कमवतो, तोच श्रेष्ठ ठरतो.

पण या पैशाच्या गणनेत पुरुषाच्या भावना, संघर्ष, मानसिक तणाव, कधी हार-मार यांचं काय? घरासाठी झिजणाऱ्या, स्वतःच्या इच्छा मागे टाकणाऱ्या, अपयश पचवूनही पुन्हा उठून चालणाऱ्या पुरुषाचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन केवळ पैशात करणं अन्यायकारक नाही का?

पुरुषही माणूस आहे. त्यालाही थकवा येतो, त्यालाही आधार हवा असतो, त्यालाही भावनिक मूल्याची गरज असते. समाजाने त्याला फक्त 'कमावणारा' म्हणून नव्हे, तर 'जाणवणारा' म्हणूनही पाहिलं पाहिजे.

शेवटी, आयुष्यात माणूस मोठा असतो तो त्याच्या विचारांनी, कृतीने, आणि इमानदारीने नाही की त्याच्या पगाराच्या आकड्यांनी...


म्हणून पुरूषाने खूप पैसा कमवावा, व्यसन व माणसे कमी पैसाच जास्त कमवावा अस आहे का ??

सुनिल पुणेTM
9359850065.

Comments