"पुरुषांचंही मन असतं… ते जपा!"

"पुरुषांचंही मन असतं… ते जपा!"

सुनिल पुणेTM यांच्या शैलीत, 8007939422

जगातील अनेक सर्व्हे सांगतात की जसं महिलांवर तणाव आहे, तसाच तणाव आता पुरुषांवरसुद्धा वाढत चाललाय...कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि स्वतःच्या भावना हे सगळं सांभाळताना पुरुष पण कुठे तरी ‘स्तब्ध’ होत चालले आहेत.

पण एक लक्षात ठेवा... ‘सर्व पुरुषांनो ! तुम्ही "पुरूष आहे म्हणून सर्वकाही सहन करावं लागतं'’ ही मानसिकता आता बदलली पाहिजे!

आजच्या युगात भारतीय पुरुषांनीही स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालं आहे.  तर चला... भारतीय पुरुषांनी स्ट्रेस कमी करण्यासाठी खालिल ह्या ‘पाच महत्वाच्या गोष्टी’ लक्षात ठेवाव्यात...

1) "बिनशर्त पुरूषार्थ" म्हणजे सर्व सहन करणे नव्हे!
तुम्ही एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल, मनात सल असेल, तर ती व्यक्त करा.
तुमचंही हसणं, रडणं, थकणं, चुकणं हे मान्य आहे.
पुरुष म्हणजे बिनभावनांचा यंत्र नव्हे... तुम्हीही माणूस आहात, ते स्विकारलं पाहिजे!

2) तुमचं कर्तृत्व तुमच्या मन:शांतीच्या किंमतीवर नको!
नोकरीत प्रमोशनसाठी जीव तोडून काम करताय पण कुटुंब, शरीर, मन विसरताय?
कृपया थांबा!
काम हे जीवनाचं एक अंग आहे, संपूर्ण जीवन नव्हे.
रोज थोडं वेळ स्वतःसाठी राखून ठेवा... स्वतःच्याही आयुष्यात "बॉस" बना.

3) तुमचं ‘पुरुषत्व’ तुमच्या कमाईवर नाही तर तुमच्या समजुतीवर ठरतं!
कधी कधी तुम्ही बायकोपेक्षा कमी कमावता, किंवा घरी तिचं निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व दिसतं...
ही गोष्ट कमीपणा वाटू नका!
तिचं यश तुमचंही आहे, तुमचं पाठबळ तिला मिळालं म्हणून ती फुलली आहे.
पुरुष म्हणून ‘मीच निर्णय घेणार’ हा हट्ट सोडा. कुटुंबात ‘मी’ नव्हे ‘आपण’ चालतं.

4) मैत्री ठेवा, संवाद ठेवा, स्वतःचं भावनिक व्हेंटिलेशन तयार ठेवा!
पुरुष अनेकदा मित्रांकडे फक्त क्रिकेट, राजकारण, उद्योग यावरच बोलतात, पण मनातील बोचती भावना बोलून दाखवायची जागा हवी.
कधीतरी "मला वाईट वाटतंय", "थकलोय", "गोंधळलोय" असं मोकळेपणाने म्हणता यायला हवं.
शोधा असे मित्र, नातं, किंवा डायरी जिच्याशी तुम्ही प्रामाणिक राहू शकता.

5) इतर पुरुषांशी तुलना थांबवा!
तो अमुक इतका कमावतो, तमुकची गाडी भारी, त्याच्या बायकोचा रिस्पेक्ट जास्त…
या स्पर्धेच्या आगीत स्वतःचा आत्मसन्मान जाळून टाकू नका.
तुमचं यश हे तुमच्या आनंदात आहे... बायको, मुलं, घर, आईवडील यांच्यासोबतची एक हसरी संध्याकाळ ही मोठं यश असू शकतं! म्हणूनच... तुम्ही फक्त कर्ता पुरूष नाही, तर एक माणूस आहात...
स्वतःला जपा, थोडं वेळ स्वतःसाठी ठेवा, प्रेम करा, वेळेवर झोपा, विनाकारण अपराधी नका वाटून घ्या...तुमचंही हसणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुमचं कमावणं आहे...हे सदैव लक्षात ठेवा.

पुढच्या जागतिक सर्व्हेमध्ये भारतीय पुरुषही ‘आनंदी आणि समतोल जीवन जगणारे’ म्हणून नमूद व्हावेत, हि सुनिल पुणे 9369850065 यांची प्रामाणिक इच्छा !

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
मानसशास्त्रीय एक्स्पर्ट, प्रशिक्षक, परिक्षक, मार्केटिंग मॅनेजर आणि पुरुषांसाठी एक प्रामाणिक आवाज

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"