शुगर डॅडी आणि शुगर मॉम : आजच्या डिजिटल युगातील एक श्रीमंत ‘नवीन निवड’ की भावनिक भरकटलेपणाचा मार्ग?

शुगर डॅडी आणि शुगर मॉम : आजच्या डिजिटल युगातील एक श्रीमंत ‘नवीन निवड’ की भावनिक भरकटलेपणाचा मार्ग?
लेखक : सुनील पुणे TM 8007939422

डिजिटल युगाने माणसाचे आयुष्य सहज, सोयीचे आणि जलद केले, पण याच युगाने नात्यांमध्ये वेगळी कलाटणी दिली. आज समाजात 'शुगर डॅडी' आणि 'शुगर मॉम' ही संकल्पना फक्त विदेशी चित्रपटांत किंवा वेबसिरीजमध्येच राहिलेली नाही, तर आपल्या आजूबाजूच्या डिजिटल विश्वात उघडपणे वावरत आहे.

शुगर डॅडी आणि शुगर मॉम म्हणजे काय?
शुगर डॅडी म्हणजे असा आर्थिकदृष्ट्या सक्षम पुरुष जो स्वतःपेक्षा खूप लहान वयाच्या मुलीशी 'भावनिक' किंवा 'काही ठिकाणी शारीरिक' नातं ठेवतो, त्या बदल्यात तिच्या शिक्षणाची, राहणीमानाची, हॉटेलिंग, गिफ्ट्स यांची जबाबदारी घेतो.
शुगर मॉम म्हणजे हीच गोष्ट उलट असते  एक श्रीमंत, वयस्कर स्त्री एका तरुण मुलाशी जवळीक ठेवते आणि त्याच्या स्वप्नांचा आर्थिक भार उचलते.

का होतेय ही निवड?
आजची तरुणाई Instagram, Tinder, Bumble सारख्या अ‍ॅप्सवर नात्यांचा शोध घेत असताना, प्रेमपेक्षा ‘लाइफस्टाईल’ आणि ‘सिक्युरिटी’ महत्त्वाची वाटू लागली आहे. दुसरीकडे, काही शुगर डॅडी/मॉम हे आयुष्यात एकटेपणामुळे किंवा स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी अशा नात्यांचा आधार घेतात.

या नात्यांमध्ये काय हरवतेय? तर,हे खरे प्रेम,
परस्पर सन्मान, 
 मानसिक स्थैर्य, 
 सामाजिक समज
असे नाते काहींना फायद्याचे वाटते, पण…
शुगर रिलेशनशिप ह्या लवकर संपणाऱ्या, ‘करारनिष्ठ’ नात्यांमध्ये मोडतात. यात 'देतो म्हणून आहे' आणि 'घेतो म्हणून आहे' हे समीकरण असते. भावनांना फारसा स्थान नसते. हे नातं 'सोयीस्कर' असते, पण ‘शाश्वत’ नसते.

संस्कार मूल्यांचं काय ?
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रेम, नातं, आणि एकमेकांचा सहवास हे आर्थिक गणितांवर नाही, तर विश्वासावर आधारित असतात. शुगर रिलेशनशिपमध्ये हा 'भावनिक गाभा'च हरवतोय.
'मी तुला सांभाळीन, तू माझ्यासोबत राहा' हे व्यवहार किती काळ टिकतील?

भविष्याचा विचार...
आजची पिढी खूप स्मार्ट आहे, पण भावनिकदृष्ट्या कोरडी होत चालली आहे. आपण डिजिटल माध्यमांवर खूप अवलंबून होत आहोत, पण आपले मानसिक आरोग्य, आत्ममूल्य, आणि नात्यांची शुद्धता आपणच जपली पाहिजे.

निष्कर्ष मी असा काढतो की...
शुगर डॅडी किंवा शुगर मॉम ही एक ‘नवीन निवड’ वाटू शकते, पण ही निवड तुमचं ‘आयुष्य’ आहे का, की एक ‘वातावरणजन्य मोह’ आहे, हे काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे.
स्वतःचं स्वत्व हरवून, दुसऱ्याच्या पैशावर उभं असलेलं नातं, कधीच भरवशाचं राहत नाही.

आजच्या डिजिटल युगात तुम्ही कोणत्या मार्गाने चालताय, हि निवड तुमचीच आहे, पण निवड योग्य केली, तरच तुमचं आयुष्य समृद्ध होईल!

सुनिल पुणे TM 9359850065
(लेखक : ज्येष्ठ फोटोग्राफर, प्रशिक्षक व सामाजिक निरीक्षक)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"