स्त्रीचं अंतरंग… एक न बोललेली कहाणी...

स्त्रीचं अंतरंग… एक न बोललेली कहाणी... 
सुनिल पुणे TM 8007939422...

ती... एक साधी भारतीय स्त्री.
लग्नाआधी बाबांचं लाडाचं पिल्लू, भावाच्या भांडणातल्या माफीचा पुल, आईची सावली, आणि मैत्रिणींसाठी नेहमी हसरी. ती जिवंत होती, मनमोकळं बोलणं, स्वप्न रंगवणं, नव्या कपड्यांची हौस, नव्या पुस्तकांचा सुगंध, आणि आयुष्यभरासाठी एक सच्चा प्रेमी शोधणं...

पण लग्नानंतर ती हळूहळू 'ती' राहिली नाही.
ती "त्यांची पत्नी" झाली, "मुलांची आई" झाली, "घराची सून" झाली...
पण स्वतःसाठी काहीच राहिलं नाही.

काळाच्या ओघात ती संसाराच्या गाड्याला पाठीवरून ढकलत राहिली.
मुलं मोठी झाली. घरात सुखसुविधा वाढल्या.
पण तिच्या मनात एक खिन्न शांतता घर करून बसली खरोखर सर्व असुन ही  "आपलं कोण आहे ?"

ती बोलू शकत नाही. कारण कोण ऐकणार?....ती रडू शकत नाही. कारण कोण पुसणार?...ती व्यक्त होऊ शकत नाही. कारण "घरातल्या बाईला इतकं काय कमी आहे?" असं म्हणणारे सगळीकडे आहेत.

तिचा प्रत्येक दिवस "तू समजशील ना?" या अपेक्षेवर सुरू होतो, आणि "कोणालाही काही फरक पडत नाही" या विचारावर संपतो....

....आणि अशातच कधीतरी अचानक तिच्या आयुष्यात येतो एक सखा… एक निर्मळ नील… एक समजूतदार पुरुष…तो तिच्या डोळ्यांतली वेदना ओळखतो. तो तिच्या हसण्यातली तुटलेली वाक्यं समजतो.
तो तिच्या अव्यक्त अश्रूंना न बोलता समजून घेतो...ना कोणती वासना, ना कोणतं आडवं विचारधन.
फक्त एकच गरज मन मोकळं करण्याची...एखाद्याशी बोलत राहण्याची.
फिरायला जाण्याची.
एखाद्या संध्याकाळी मनसोक्त बागडण्याची...विना अपेक्षा, विना बंधन...ती पहिल्यांदाच स्वतःसाठी जगते...फुलते...तिच्या डोळ्यांत पुन्हा चमक दिसू लागते...तिचा आत्मा पुन्हा एकदा स्वच्छ श्वास घेतो.
ती कुणाच्या विरोधात नाही, पण आता ती "स्वतःसाठी" आहे.

पुर्वीच्या व आजच्या डिजिटल युगातील पुरुषांच्या समाजात, जेव्हा अनेक पुरूष, पती, मुले, इतर घरच्या बायकोला दुर्लक्षित करत, दुसऱ्या स्त्रीबरोबर चहा प्यायचे व पार्टी, पबचे सुख घेतात, तेव्हा कोण विचारतो का घरातल्या त्या स्त्रीच्या भावनांना...?

म्हणूनच... जर तिच्या वाट्याला असा एक "निर्मळ नील" आला तर ते तिचं भाग्यच की. तो तिच्या कृष्णासारखा तिचं दुःख ऐकणारा असतो,  फक्त मनाचं ओझं हलकं करणारा...ती त्या नात्याला नाव देत नाही. ती त्या नात्याला मागणी करत नाही. ती फक्त पुन्हा एकदा जगते. आणि इतकंच पुरेसं असतं एका स्त्रीसाठी.

स्त्रीच्या अशा अव्यक्त भावनांना समजून घेणं हेच खऱ्या माणुसकीचं लक्षण आहे.

कारण ती फक्त सून, बायको, आई नाही…ती देखील "एक माणूस" आहे!

लेखक: सुनिल पुणे TM
9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"