"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"

*"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"*
(सुनिल पुणेTM 8007939422)

आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खूप पुढे आलो आहोत, पण या प्रगतीच्या गडगडाटात एक गोष्ट हळूहळू हरवत चालली आहे  ती म्हणजे "मनाच्या गाभ्याची समज". विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधांमध्ये ही समज अजूनही तितकीशी रुजलेली नाही, जितकी असायला हवी.

पुरुषाने स्त्रीच्या मनाचा गाभा समजून घेणे हे फक्त तिच्या भावना समजणे नव्हे, तर तिच्या विचारांचा, तिच्या धडपडीचा आणि तिच्या अबोल वेदनांचा सन्मान करणे होय. ती कधी आई असते, कधी पत्नी, कधी बहीण आणि कधी सखीही असते  पण प्रत्येक भूमिकेत ती प्रेम देते, समर्पण करते आणि न बोलता खूप काही सहन करते. स्त्रीच्या नाजूक मनाला आणि तिच्या स्वप्नांना आदराने हात लावणं, तिच्या अस्तित्वाचं कौतुक करणं हे खऱ्या अर्थाने पुरुषत्व आहे.

पण याच वेळी हे देखील तितकंच खरं आहे की, स्त्रीनेही पुरुषाच्या भावविश्वाला समजून घेणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये भावना कमी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. अनेकदा ते गप्प राहतात, पण त्यांच्यामध्येही भीती, अपयशाची जाणीव, जबाबदाऱ्यांचा ताण असतो  आणि या गोष्टी कुणी समजून घेत नाहीत. आजच्या सोशल मीडियाच्या काळात ‘परफेक्ट रिलेशनशिप्स’चे खोटे मापदंड गाजत असले, तरी खरं नातं हे परस्पर समजुतीवरच उभं राहतं.

प्रेम हे कधी एकतर्फी नसते मग समजूतही एकतर्फी कशी चालेल बर ?
समजून घेणं, ऐकून घेणं, वेळ देणं आणि गरज असताना एकमेकांच्या बाजूने उभं राहणं हेच तर खरं नातं. आणि हे सगळं डिजिटल व सोशल युगात अजून महत्त्वाचं ठरतं कारण आज 'फॉलो', 'लाईक', 'ब्लॉक' या आभासी गोष्टींमध्ये खऱ्या भावना हरवून जात आहेत.

आज नातं जपण्यासाठी आपल्याला एकमेकांचे notifications नाही तर emotions समजायला हवेत. आपल्याला एकमेकांचे posts नाही तर past आणि present समजून घ्यायला हवेत. आणि एकमेकांचे status updates नव्हे, तर silent struggles वाचायला शिकावं लागेल.

प्रत्येकाच्या मनाचा गाभा समजून घेताना शब्दांच्या मागे दडलेली वेदना आणि हास्याच्या आड लपलेली हळहळ ओळखावी लागते. तेव्हा कुठे, "समजूतदारपणा" नावाचं पाणी या नात्याच्या रोपट्याला वाढवू शकतं.

शेवटी एवढंच म्हणेन मी सुनिल, 
"एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल, तर नातं चालतं;
केवळ *अपेक्षा ठेवल्या, पण समज नसेल तर नातं संपतं!"*

सुनिल पुणेTM 9359850965, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"