स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण
स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण
लेखक – Sunil Pune TM
"इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगणं सोपं असतं", ही ओळ जशी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होते, तशीच ती एका प्रेमळ स्त्रीच्या जीवनात खोलवर रुतलेली असते.
एक स्त्री जेव्हा प्रेम करते, तेव्हा ती अपेक्षा करत नाही, फक्त समजून घेण्याची इच्छा बाळगते. पण दुर्दैव म्हणजे, तिचे खरे प्रेम अनेकदा गैरसमजाच्या वादळात अडकते. ती समजून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःला पूर्णपणे विसरते आणि अखेर आपल्याच अस्तित्वाचा बळी देते.
ती कुठलाही प्रसंग बोलून व्यक्त करत नाही, ती केवळ नजरेतून, कृतीतून, आपल्या छोट्या छोट्या सवयींतून भावना दाखवते. पण समोरच्याने त्या भावना समजून घ्याव्यात, अशी तिची मूक अपेक्षा असते. जेव्हा हे अपेक्षांचे ऋणानुबंध गैरसमजात गुंततात, तेव्हा ती स्त्री कुणावरही दोष न देता स्वतःलाच बदलते...आणि हेच तिचं समर्पण असतं! इथेच तिचाच बळी जातो.
कधी कधी, एक साधा शब्द, एक स्पष्ट संवाद, किंवा एक विश्वासाचं हसणं हे खूप काही सांगू शकलं असतं, पण पुरुष समजून घ्यायच्या आधीच नातं तुटलेलं असतं.
कारण "ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशाराही पुरेसा असतो आणि ज्याला नाहीच समजून घ्यायचं, त्याला आयुष्यभर सांगूनही समजत नाही!"
स्त्री कुणालाही दोष देत नाही, कारण तिला खरं प्रेम माहित असतं. पण त्या प्रेमासाठी ती झिजते, झुरते आणि कधीकधी आयुष्यभर रडत राहते , फक्त त्या एका गैरसमजाच्या जीवघेण्या बोचेमुळे.
ती स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान, आणि तिचं सर्वस्व गमावूनसुद्धा दुसऱ्याचा आदर राखते. प्रेमात ती हरली तरी प्रेमावरचा विश्वास हरवत नाही. ती स्वतः बळी जाते, पण खरं प्रेम टिकून राहावं म्हणून काहीच बोलत नाही.
त्या स्त्रीसाठी एकच शब्द "तू खरंच महान आहेस!"
या लेखाच्या माध्यमातून आपण प्रत्येक पुरुषाने विचार करावा, की तो केवळ तिच्या बोलण्याकडे नाही, तर तिच्या शांततेकडेही लक्ष देतो का? तिचा हसरा चेहरा कधी खोटा तर नाही ना? आणि तिच्या डोळ्यांतल्या शांततेमागे कुठला वेदनेचा महापूर दडलेला तर नाही ना?
जर याचे उत्तर 'हो' असेल, तर ती स्त्री अजूनही तुमचं खरं प्रेम मानते.
"समजून घेणं ही कला नसून, नात्यांची खरी परीक्षा असते!"
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment