स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान
*स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान* सुनिल पुणे™ 8007939422 स्त्रीचं मन म्हणजे एक अतीशय नाजूक आणि गूढ अशी कविता असते, जिला समजून घेणं प्रत्येकाच्या हातात नसतं. ती कोणालाही सहजपणे तिच्या अंतर्मनात प्रवेश देत नाही. ती हसते, बोलते, वावरते… पण तिच्या मनाच्या दाराशी उभं राहून खरं प्रेम कोण करतंय, हे ती खोलवर समजून घेते. आणि एकदा तिच्या मनाच्या मंदिरात जर तिने कोणाला स्थान दिलं, तर मग ती त्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकते. तिचं ते प्रेम असतं निस्सीम, नि:स्वार्थ आणि अबाधित. आणि जर त्या हृदयात स्थान मिळालं असेल एका लेखकाला, तर तो भाग्यवंत ठरतो. लेखकाचं कार्य केवळ शब्दांतून भावना मांडणं नसतं, तर तो स्त्रीच्या अव्यक्त भावना समजून त्यांना आपल्या लेखणीतून ओघवत्या पाण्यासारख्या सहजपणे मांडतो. जग जिथे तिला समजून घेण्यात कमी पडतं, तिथे हा लेखक तिच्या मनाच्या प्रत्येक वळणावरून चालतो. तिच्या डोळ्यांतले अश्रू ओळखतो, तिच्या हास्यामागचं दुःख शब्दबद्ध करतो. जेव्हा ती लेखकावर विश्वास ठेवते, तेव्हा तिला वाटतं की "हा शब्दांचा जादूगार मला समजतो, माझ्या भावना ऐकतो, माझं मौनही वाचतो." तेव्हा ती त्या लेखकाच्या...