गृहिणी ही घराची सीईओ
"गृहिणी ही घराची सीईओ !"
लेखक: Sunil Pune TM 8007939422
*आपण आज कितीही प्रगत झालो असलो, जगभरातून काम करत असलो,* तरी आपल्या प्रत्येक यशामागे एक न दिसणारा आधार असतो, ती म्हणजे गृहिणी. घराचं व्यवस्थापन, मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, नवऱ्याचा पाठिंबा आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं नियोजन, हे सगळं ती कोणत्याही पगाराशिवाय न थकता, न कंटाळता करते.
हे केवळ काम नाही, ही एक पूर्णवेळ जबाबदारी आहे.
नोकरी करणाऱ्या महिलांना वेतन मिळतो, टायटल मिळतो, वर्धापन दिन साजरा केला जातो. पण घर चालवणाऱ्या बायकांना केवळ कर्तव्य समजून आपण त्यांचा आदर करतो. खरं तर तिचंही योगदान घरापुरतं मर्यादित नाही, ती एक संपूर्ण व्यवस्थापन यंत्रणा आहे.
गृहिणीचं कॉर्पोरेट पद *C.H.O. – Chief Home Officer*
या पदानुसार ती घरातील:
*HR Manager* घरातील सर्व सदस्यांचं मन आणि भावना समजून घेते.
*Finance Officer* घरखर्चाचं काटेकोर बजेट बनवते.
*Logistics Head* स्वयंपाक, खरेदी, मुलांच्या शाळेची व्यवस्था करते.
*Event Planner* सण-समारंभ, वाढदिवस, पाहुणचार सगळं नियोजनबद्ध करते.
*Healthcare Manager* सगळ्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवते.
*Emotional Consultant* सर्वांची मानसिक शांतता राखते.
ही एक व्यक्ती असते, पण ती अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलते.
घराच्या चार भिंतींसारखी मजबूत-
ती आपल्याला रोजची गरज असते, पण ती कधीच तिचं महत्त्व सांगत नाही. तिला सुट्टी नाही, बोनस नाही, प्रमोशन नाही, तरी ती आनंदी असते, कारण तिचं ऑफिस म्हणजे तिचं घर, आणि तिचं यश म्हणजे कुटुंबाचं समाधान.
आज प्रत्येकाने आपल्या घरातील गृहिणीला एक मानाचा मुजरा करावा. तिचं कौतुक केवळ आठवणीने नको, तर रोजच्या जगण्यात करावं. कारण ती फक्त “घरकाम करणारी बाई” नाही, ती आहे *Chief Home Officer* आपल्या आयुष्याची खरी यशस्वी व्यवस्थापक.
सुनिल जाधव, पुणेTM 9359850065.
(गृहिणींच्या न नावाजलेल्या परिश्रमाला समर्पित लेख)
Comments
Post a Comment