हक्काचा मित्र/मैत्रीण"

*"हक्काचा मित्र/मैत्रीण"*
सुनिल पुणे TM 8007939422

आयुष्य हे रोज नव्या प्रश्नांनी भरलेलं असतं. कधी मनासारखं घडतं, तर कधी अगदी विरुद्ध. सुख-दुःखाचं चक्र अखंड फिरत राहतं. पण या साऱ्या गडबडीत, या धावपळीत, जेव्हा कुणीतरी आपल्याला "तुझ्या चेहऱ्यावर काही तरी वेगळं दिसतंय, काय झालंय सांग ना..." असं हळू आवाजात विचारतं,  तेव्हा तो क्षण म्हणजे खरं सुख असतं!

जगात कितीही लोक असले, सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स असले, तरी एक हक्काचा माणूस हवा,  जो आपल्याला समजून घेईल, आपल्या चेहऱ्यावरचं खोटं हसू ओळखेल, आणि शब्दांपलीकडचं दुःखही समजेल. असा माणूस मिळणं हीच आजच्या काळात संपत्ती आहे.

कधी कधी आपण खूप थकलोले असतो, मनात वादळं असतात पण ओठांवर हसू असतं. अशा वेळी एखादा मित्र किंवा मैत्रीण जेव्हा थांबून फक्त विचारतो, "सांग ना, काय झालंय?"  तेव्हा वाटतं, अजूनही माणुसकी जिवंत आहे.

हा हक्काचा माणूस तुमचा बालपणीचा मित्र असू शकतो, कॉलेजमधला ग्रुपमधला कोणी असू शकतो, ऑफिसमधला सहकारी, किंवा अगदी घरातील बहीण-भाऊ. पण हा माणूस असा असतो, की त्याच्याशी बोलल्यानंतर ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं.
तो हक्क गृहीत धरलेला नसतो, तो प्रेमाने जपलेला असतो.

आजच्या काळात प्रत्येकाने स्वतःसाठी एक असा हक्काचा माणूस निर्माण करावा, आणि दुसऱ्याचा हक्काचा माणूस व्हावं.
एवढंच,  कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी स्वतःचा वेळ आणि मन देणं, हीच खरी माणुसकी आहे.

आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावरचं दुःख ओळखतो का?
की फक्त स्वतःच्या समस्यांमध्ये अडकलेलो असतो?
आज थोडं थांबा, एखाद्या मित्राला/मैत्रिणीला फोन करा आणि फक्त सांगा,
"काय झालंय सांग ना... मी ऐकतोय!"

कारण,  *"आयुष्यात सुख नसले तरी चालेल, पण हक्काने विचारणारा कोणी तरी हवा!"*

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(फोटोग्राफर्सचा आपुलकीचा आवाज)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...