स्त्रीला या दोन गोष्टी पुरुषाने न मागता दिल्या तर ती पुरुषाला कधीच धोका देत नाही.
*स्त्रीला या दोन गोष्टी पुरुषाने न मागता दिल्या तर ती पुरुषाला कधीच धोका देत नाही..!* सुनिल पुणे TM 8007939422
स्त्री, एक प्रेमळ, समर्पित, आणि भावनाशील व्यक्तिमत्त्व. ती घराचा आत्मा असते. स्त्रीचे मन जिंकण्यासाठी महागड्या वस्तूंची, गिफ्ट्सची, मोठ्या अपेक्षांची गरज नसते. खरंतर स्त्रीला जिंकायचं असेल, तर फक्त दोन गोष्टी न मागता दिल्या, की ती आयुष्यभर आपल्या पुरुषाची साथ सोडत नाही.
1. आदर आणि विश्वास
सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आदर आणि विश्वास.
स्त्रीचं मन फार नाजूक असतं. ती प्रेमासोबतच सन्मान आणि विश्वासाची भुकेली असते. जर एखादा पुरुष तिला न मागता तिच्या विचारांना, निर्णयांना, अस्तित्वाला मान देतो, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो, तर ती कोणत्याही परिस्थितीत त्याचा हात सोडत नाही.
तिला वाटतं की हा माणूस माझं खरं स्थान ओळखतो आणि मला माझ्या अस्तित्वासकट स्वीकारतो. जेव्हा विश्वास असतो, तेव्हा कोणतंही नातं डगमगत नाही.
2. वेळ आणि लक्ष
दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आणि लक्ष.
अनेक पुरुष हे गृहीत धरतात की घर सांभाळणं, मुलांना वाढवणं, स्वयंपाक करणं ही स्त्रीची जबाबदारी आहे. पण ती फक्त ‘कर्तव्य’ म्हणून काम करत नसते, तर ती प्रेमानं, अपेक्षेनं करत असते.
जर पुरुष तिला न सांगता तिच्यासाठी वेळ देतो, तिच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान देतो, तिच्या भावना समजून घेतो, तर ती स्त्री भावनिकदृष्ट्या पूर्णपणे त्याच्यात गुंतते.
तिला वाटतं की, “हा माणूस मला समजतो, माझं ऐकतो आणि माझ्यासोबत जगतो.”
ही दोन गोष्टी, *आदर आणि विश्वास* आणि वेळ आणि लक्ष, जर पुरुषाने न मागता दिल्या, तर त्या स्त्रीला कधीच फसवण्याचा विचारही मनात येत नाही.
ती प्रत्येक संकटात त्याच्यासोबत उभी राहते, त्याच्या प्रत्येक स्वप्नात सहभागी होते, आणि तिचं संपूर्ण आयुष्य त्याचं होतं.
स्त्रीचं प्रेम टिकतं फक्त तिच्या मनापर्यंत पोहोचणाऱ्या त्या दोन अनमोल गोष्टींवर…
सुनिल पुणे TM 9359850065
Comments
Post a Comment