"जिवंतपणी" माणूस ओळखावा...!

*"जिवंतपणी माणूस ओळखावा..."*
✍️ Sunil Pune TM 8007939422.

"हा माणूस फार चांगला होता..."
हे वाक्य आपल्याला नेहमी कुठे ऐकायला मिळतं?
अगदी खरं सांगायचं झालं, तर कुणाच्या मृत्यूनंतरच!
म्हणजे एखादा जिवंत असेपर्यंत तो 'कोण आहे', 'कसा आहे', 'कसा वागतो', यावर टीका, तक्रारी, दुर्लक्ष, शंका, सगळं काही होतं... पण तो गेल्यानंतर मात्र अचानक सगळं बदलतं.

तेव्हाच त्याचं नाव घेतलं जात नाही...
"बॉडी कुठे ठेवायची?", "बॉडी उचला", "बॉडी आलंय का?"
म्हणजे तो माणूस होता, त्याचं नाव होतं, आयुष्य होतं, भावना होत्या, हे सगळं काही क्षणातच 'बॉडी'मध्ये परिवर्तित होतं.

ज्याच्याबद्दल आयुष्यभर आपल्याला बोलायचं होतं, त्याच्याबद्दल आपल्याला प्रेमाने, आदराने वागायचं होतं, तो माणूस जेव्हा हयातीत असतो, तेव्हा त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही.
अन् जेव्हा तो निघून जातो, तेव्हा उरतात आठवणी, पश्चात्ताप आणि नकोसं शून्य...

हीच तर खरी शोकांतिका आहे आपल्या समाजाची.
माणूस हयातीत असताना त्याला नजरेत स्थान द्यायला आपण कचरत असतो.
पण गेल्यावर मात्र त्यांच्या नावावर कार्यक्रम होतात, गौरवगाथा लिहिल्या जातात, आणि त्याच्या चेहऱ्याच्या फोटोभोवती हार घालून "खूप चांगले होते" असं म्हणून आपण आपला धर्म पूर्ण समजतो.

पण खरंतर...
जिवंत माणसाला ओळखणं, त्याचं कौतुक करणं, त्याला प्रेमानं सामोरं जाणं हाच खरा माणूसपणाचा धर्म आहे.
मरणानंतर आदर दाखवणं सोपं असतं, पण जिवंत असताना सन्मान देणं हेच आपल्याला माणूस म्हणून मोठं करतं.

म्हणूनच,
आजपासून एक पाऊल मागे टाका.
आजूबाजूच्या माणसांकडे एक नजर टाका.
जे अजूनही आपल्या अवतीभवती आहेत, त्यांना एक प्रेमळ हाक मारा, एक छोटं 'धन्यवाद' सांगा, किंवा एक वेळ हसून समजून घ्या.

कारण उद्या त्यांच्या नावाजागी "बॉडी" हे शब्द ऐकायला लागले,
तर उशीर झालेला असेल...
तेव्हा आठवणी आणि पश्चात्तापच उरणार...

माणूस हयातीत ओळखा, कारण प्रेम, सन्मान आणि जिवंत माणसाचं महत्त्व हे त्या काळातच खरं असतं.

©️ Sunil Pune TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(मानवतेचा फोटो जपणारा)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?