Posts

Showing posts from March, 2026

तू नसशील तर मीही नाही…

एकदा कोणाच्यात जीव अडकला ना… तेव्हा प्रेम फक्त भावना राहत नाही, ते श्वासासारखं होतं, नसले तर जगणं अशक्य, आणि असले तर प्रत्येक क्षण जिवंत… कथा: “तू नसशील तर मीही नाही…” लेखक: सुनिल पुणेTM 9359850065 रात्रीचे साडेदहा वाजले होते. पुण्याच्या त्या शांत रस्त्यावर हलकीशी थंडी आणि मंद वारा… आणि एका कॅफेच्या कोपऱ्यात बसलेली अन्वी. तिच्या समोर दोन कप कॉफी… एक थंड झालेला, आणि एक अजूनही वाफाळत होता. ती वारंवार मोबाईल पाहत होती… “तो येईल का… की आजही नाही?” तिच्या मनात विचारांचं वादळ चालू होतं. तेवढ्यात दरवाजा हलकेच उघडला… आणि आत आला विराज. त्याला पाहताच तिच्या डोळ्यांत चमक आली… पण ओठांवर राग. “आता येतोयस? एक तास झाला मी वाट पाहतेय!”  अन्वीचा आवाज थोडा कडक. विराज शांतपणे तिच्यासमोर बसला… “माफ कर… पण येणं खूप गरजेचं होतं.” “माझ्यासाठी की स्वतःसाठी?” ती कटाक्ष टाकत म्हणाली. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला… “दोघांसाठी…” काही क्षण शांतता… कॅफेमध्ये हलकं संगीत वाजत होतं… पण त्यांच्या मनात मात्र असंख्य शब्द अडकले होते. “अन्वी… मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.”  विराज हळू आवाजात म्हणाला. “मला पण.”...

आयुष्यात ! हरवल्याचे दुख का ?

आयुष्यात ! हरवल्याचे दुख का ? लेखक: सुनिल पुणेTM 9359850065. “आज जे हरवले आहे, ते पृथ्वीवर आलो तेव्हा आणले होते का…?” हा प्रश्न जणू काही अचानकच समोर उभा राहिला होता. संध्याकाळचा वेळ… आकाशात सूर्य मावळतीकडे झुकत होता. लालसर किरणांनी संपूर्ण वातावरण शांत आणि चिंतनशील झालं होतं. गावाच्या काठावरच्या त्या जुन्या वडाच्या झाडाखाली, दोन पिढ्या समोरासमोर बसल्या होत्या  एक होता अनुभवाने समृद्ध राघव काका, आणि दुसरा होता प्रश्नांनी भरलेला आदित्य. आदित्य (थोडा व्याकुळ होऊन): “काका… आयुष्यात खूप काही हरवतंय असं वाटतंय. नातं, माणसं, पैसा… कधी कधी स्वतःलाही हरवल्यासारखं वाटतं…” राघव काका (हसत, शांत स्वरात): “मग एक प्रश्न विचारतो… जे हरवतंय, ते तू जन्माला येताना सोबत आणलं होतंस का?” आदित्य थोडा थबकला… त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. आदित्य: “नाही काका… पण मग असं का वाटतं की सगळं संपत चाललंय?” राघव काकांनी थोडा वेळ आकाशाकडे पाहिलं… जणू काही ते उत्तर शब्दांत नाही, तर अनुभवांतून देणार होते. राघव काका: “बाळा… आपण या जगात आलो तेव्हा हात रिकामे होते… आणि जातानाही रिकामेच जाणार आहोत. मग मध्ये ज...

“प्रेम" वयाच्या पलीकडचं पण एक सुंदर सत्य”

“प्रेम" वयाच्या पलीकडचं पण एक सुंदर सत्य” लेखक सुनिल पुणेTM 9359850065 तिच्या चेहऱ्यावरची ती हलकीशी स्मितरेषा डोळ्यांतली शांत चमक आणि कपाळावरचा तो छोटासा काळा ठिपका  जणू आयुष्याने दिलेल्या अनुभवांची साक्ष देत होता. पण त्या सगळ्यांपेक्षा अधिक काहीतरी होतं तिच्यात ते म्हणजे समजून घेणारं मन. लोक नेहमी विचारतात  “प्रेमाला वय असतं का?” पण खरा प्रश्न हा आहे की, प्रेमाला मर्यादा असते का? आयुष्यात काही नाती अचानक येतात कुठलीही पूर्वतयारी नसताना. सुरुवातीला वाटतं, ही फक्त ओळख आहे नंतर मैत्री होते आणि मग एक दिवस लक्षात येतं  हे फक्त नातं नाही, हे तर मनाचं घर बनलंय. प्रेम तेव्हाच सुंदर होतं, जेव्हा कोणी तुमचं बोलणं ऐकतं म्हणून नाही तर तुमचं न बोललेलंही समजून घेतं. जिथे शब्द कमी पडतात, तिथे भावना संवाद साधतात आणि जिथे मन जुळतं, तिथे वय, अंतर, परिस्थिती  सगळं गौण ठरतं. खरं प्रेम म्हणजे रोज “I love you” म्हणणं नाही तर एखाद्या दिवशी शांत बसूनही एकमेकांची साथ जाणवणं आहे. ती म्हणाली होती, “माझ्या आयुष्यात खूप लोक आले पण जे माझ्या मनाला समजून घेतलं, ते खूप कमी” आणि तो हसून म्हणाला, “म...

रविवार स्पेशल: मित्रानो ! “चला रे, चढती है तो चढने दो!”

रविवार स्पेशल: मित्रानो ! “चला रे, चढती है तो चढने दो!”  लेखक: सुनिल पुणेTM 9359850065 रविवार म्हणजे फक्त आठवड्याचा शेवट नाही तो आहे “मन मोकळं करण्याचा दिवस!” आठवडाभर काम, जबाबदाऱ्या, टेन्शन आणि मग येतो रविवार  जिथे मन म्हणतं, “यारो मुझे माफ करो मैं नशे में हूँ!”  पण हा नशा फक्त दारूचा नसतो तो असतो मैत्रीचा, हसण्याचा, आणि त्या छोट्या-छोट्या आनंदांचा! एका कोपऱ्यात बसलेले मित्र, हातात थंडगार ग्लास कोणी म्हणतं  “Save Water, Drink Beer!” तर दुसरा लगेच टोमणा मारतो  “पहिले ४ दिन बाकी आहे बेकार दिन आजच खरी लाईफ!”  रविवार म्हणजेच ती “Cheers Moment” जिथे दोन ग्लास टकरतात, पण खरं तर मनं जुळतात पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? दारू फक्त निमित्त असतं  खरा नशा असतो... 'जुन्या आठवणींत' 'मस्त गप्पांत' आणि त्या मित्रांत, जे काहीही झालं तरी सोबत असतात! कोणी जुनी प्रेमकहाणी सांगतो कोणी बॉसची मिमिक्री करतो तर कोणी आयुष्याचं तत्त्वज्ञान मांडतो  “चढती है तो चढने दो लेकिन जिंदगी कभी उतरू नये!”  रविवारचा फंडा सोपा आहे  'थोडी मजा करा' 'मनसोक्त हसा' 'मित्रांसोबत व...

स्वतःसोबतची मैत्री हाच आनंदाचा खरा शोध

स्वतःसोबतची मैत्री हाच आनंदाचा खरा शोध लेखक: सुनिल पुणे TM 9359850065. “काय रे, आज खूप शांत दिसतोस?” माझ्या मित्राने सकाळच्या वेळी फिरताना सहज विचारलं. मी हसत म्हणालो, “शांत नाही… फक्त थोडा समाधानी आहे.” तो थोडा आश्चर्याने म्हणाला, “समाधानी? म्हणजे काही मोठं घडलं का?” मी हळूच उत्तर दिलं, “मोठं काही घडलं नाही… पण एक मोठी गोष्ट समजली.” तो उत्सुकतेने म्हणाला, “काय?” मी म्हणालो, “माणूस जर स्वतःला खुश ठेवायला शिकला ना… तर आयुष्य खूप सुंदर होतं.” तो थोडा हसत म्हणाला, “अरे पण माणूस एकटा कसा खुश राहणार? आनंदासाठी माणसाला सोबत लागतेच.” मी शांतपणे म्हणालो, “सोबत लागते… पण ती कायमची असते का?” तो काही क्षण गप्प राहिला. मी पुढे बोलायला सुरुवात केली  “आयुष्यात अनेक माणसं येतात… काही थोड्या वेळासाठी, काही थोड्या वर्षांसाठी… आणि काही फक्त आठवणी बनून राहतात. पण एक माणूस असा आहे जो जन्मापासून शेवटपर्यंत आपल्यासोबत असतो.” तो म्हणाला, “कोण?” मी हसून उत्तर दिलं, “आपण स्वतः.” तो म्हणाला, “पण आपण स्वतःसोबत कधी जगतोच कुठे? आपण नेहमी इतरांसाठीच धावपळ करत असतो.” मी मान हलवली आणि म्हणालो, “बरोबर आहे. आपण आयु...

दुसर्‍यांचे दोष शोधायची सवय असेल, तर आधी स्वतःचे दोष शोधा.

दुसर्‍यांचे दोष शोधायची सवय असेल, तर आधी स्वतःचे दोष शोधा. लेखक : सुनिल पुणेTM 9359850065. “बुराई शोधण्याचा शौक असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, दुसऱ्यांपासून नाही” कारण  या एका साध्या वाटणाऱ्या विचारात आयुष्याचा मोठा धडा दडलेला आहे. आज आपण ज्या समाजात जगतो, तिथे दुसऱ्यांच्या चुका शोधणे हा जणू काही छंदच झाला आहे. कोण काय बोललं, कोण कसं वागलं, कोणाचं आयुष्य कसं आहे, यावर चर्चा करायला आपण नेहमी तयार असतो; पण स्वतःकडे पाहण्याची वेळ आली की आपण मात्र नजरा चुकवतो. दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे खूप सोपं असतं. कारण त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज नसते. फक्त टीका करायची, तुलना करायची आणि स्वतःला श्रेष्ठ समजायचं. पण खरा विकास तिथे सुरू होतो, जिथे आपण स्वतःच्या कमतरता मान्य करतो. स्वतःच्या चुका स्वीकारणं ही कमजोरी नसून ती प्रगल्भतेची निशाणी आहे. आपण अनेकदा म्हणतो, “समाज बदलला पाहिजे.” पण समाज म्हणजे नेमकं कोण? आपणच ना! जर प्रत्येकाने स्वतःपासून बदलाची सुरुवात केली, तर समाज आपोआप बदलू लागेल. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावातील कठोरपणा, अहंकार, मत्सर, आळस, दुर्लक्ष हे दोष आपण  ...

"वृद्ध होत चाललेले पालक आणि व्यस्त होत चाललेली डिजिटल मोबाईल पिढी, हिच खरी नात्यांतील अदृश्य दरी"

"वृद्ध होत चाललेले पालक आणि व्यस्त होत चाललेली डिजिटल मोबाईल पिढी, हिच खरी नात्यांतील अदृश्य दरी" लेखक: सुनिल पुणेTM 9359850065. समाजातील अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करतो जसे स्त्रीभ्रूणहत्या, बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार, डिजिटल व्यसन, पर्यावरण. पण एक विषय असा आहे, जो आपल्या डोळ्यासमोर रोज घडतो, तरी त्यावर फारसं कोणी बोलत नाही. तो विषय म्हणजे, जिवंत असलेल्या पालकांच्या भावनिक एकाकीपणाचा. हो, वृद्धाश्रम हा विषय वेगळा आहे. तो दिसतो. त्यावर लेख लिहिले जातात. पण ज्या घरात आई-वडील आपल्या मुलांसोबतच राहतात, तरीही आतून एकाकी, उपेक्षित आणि न बोललेले दु:ख घेऊन जगत असतात, त्या भावनिक अंतरावर कोणी भाष्य करत नाही. आजची पिढी अत्यंत कर्तबगार आहे. शिक्षण, करिअर, पैसा, परदेशी संधी, डिजिटल, मोबाईल जग हे सर्व काही त्यांच्या हातात आहे. पण या धावपळीत एक गोष्ट नकळत हरवत चालली आहे, ती म्हणजे  आई वडिलांसोबतचा संवाद. आपण त्यांना सर्व सोयी देतो एसी खोली, टीव्ही, औषधे, चांगले अन्न. पण त्यांना हवं असतं ते फक्त दोन क्षणांचं मनापासून बोलणं. त्यांना पैशांची गरज नसते, त्यांना गरज असते फक्त आपुलकीची. वृद्ध ...

"दुश्मनी नव्हे, दुर्लक्ष शिका ! आयुष्य आनंदी ठेवा" ! लेखक: सुनिल पुणेTM 9359850065.

"दुश्मनी नव्हे, दुर्लक्ष शिका ! आयुष्य आनंदी ठेवा" ! लेखक: सुनिल पुणेTM 9359850065. आयुष्याच्या प्रवासात आपण असंख्य माणसांना भेटत असतो. काही जिवाभावाचे होतात, काही केवळ ओळखीपुरते राहतात, तर काहींच्याशी मतभेद होतात, वाद होतात, कधी रागही येतो आणि भांडणही होते. हे सगळं आयुष्याचाच एक भाग आहे. दोन वेगवेगळ्या विचारांचे, स्वभावांचे आणि अनुभवांचे माणसं एकत्र आली की मतभेद होणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्या मतभेदाचं रूपांतर आपण दुश्मनीत करतो, तेव्हा खरी चूक तिथेच घडते. कारण वाद हा क्षणिक असतो, पण दुश्मनी ही दीर्घकाळ मनात साठवलेली कटुता असते. दुश्मनी म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न नसतो, ती स्वतःलाच दिलेली शिक्षा असते. आपण मनात राग धरून ठेवतो, सूडाची भावना जपतो, त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करत राहतो; पण त्या सगळ्यात जास्त त्रास होतो तो आपल्या मनाला. दिवस जातात, कामं चालू असतात, आयुष्य पुढे सरकत असतं; पण मन मात्र त्या एका घटनेभोवती अडकून पडलेलं असतं. रात्री झोप लागत नाही, सतत मनात संभाषणं चालू असतात, आपण काय बोलायला हवं होतं, काय उत्तर द्यायला हवं होतं याचे विचार फिरत राहतात. यात ...

क्षणिक सुखापेक्षा प्रेमाचा शाश्वत स्पर्श, लेखक: सुनिल पुणेTM 9359850065.

क्षणिक सुखापेक्षा प्रेमाचा शाश्वत स्पर्श,  लेखक: सुनिल पुणेTM 9359850065. तरुण रक्त उसळत असताना शरीराच्या इच्छा जागृत होतात, आकर्षणांचे वारे वाहू लागतात आणि क्षणिक सुखालाच जीवनाचे केंद्र समजण्याची चूक अनेकांकडून होते. त्या वयात देहाची भूक मोठी वाटते; स्पर्श, जवळीक, मोह आणि वासना यांनाच प्रेमाचा अर्थ दिला जातो. पण काळ पुढे सरकत जातो तसं लक्षात येतं की शरीराच्या गरजा वयाबरोबर कमी-जास्त होत राहतात; मात्र मनाची तहान मात्र कायम असते  ती तहान असते प्रेमाची, जिव्हाळ्याची, समजुतीची आणि आपलेपणाची. सेक्स ही शरीराची गरज आहे; ती एका विशिष्ट वयात तीव्रतेने जाणवते आणि नंतर नैसर्गिकरीत्या मंदावते. पण प्रेम हे वयाच्या चौकटीत अडकत नाही. ते बालपणात आईच्या कुशीत असतं, तारुण्यात साथीदाराच्या नजरेत असतं, प्रौढपणी जबाबदाऱ्यांच्या आधारात असतं आणि वृद्धापकाळात एखाद्या हाताच्या उबेत असतं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीदेखील जर कुणाचा प्रेमळ स्पर्श, आपुलकीची नजर किंवा “मी आहे तुझ्यासोबत” हे शब्द मिळाले, तर माणूस शांतपणे डोळे मिटू शकतो. कारण प्रेम शरीराला नव्हे, तर आत्म्याला विसावा देतं. क्षणिक आनंदाला स्वर...

होळी २ मार्च २०२६ रंगांच्या पलीकडचा खरा अर्थ, लेखक सुनिल पुणेTM 93598 50065

होळी २ मार्च २०२६  रंगांच्या पलीकडचा खरा अर्थ लेखक सुनिल पुणेTM 93598 50065  आज २ मार्च २०२६. वातावरणात हलकी उष्णता, हवेत गुलालाचा सुगंध, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी  होळीचा सण पुन्हा एकदा आपल्या दारी आला आहे. पण होळी म्हणजे फक्त रंगांची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि उत्साहाचा जल्लोष एवढेच आहे का? की या सणामागे काही खोल सामाजिक आणि मानवी अर्थ दडलेला आहे? होळी हा सण आपल्याला वाईट प्रवृत्ती जाळून टाकण्याचा संदेश देतो. प्रह्लाद यांच्या अढळ श्रद्धेचा आणि होलिका यांच्या अहंकाराचा शेवट यामधून आपल्याला समजतो की सत्य, संयम आणि विश्वास यांची शक्ती सर्वात मोठी असते. ही कथा केवळ पौराणिक नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी वास्तव घटना आहे. प्रत्येकाच्या मनात एक प्रह्लाद आहे, जो चांगुलपणासाठी उभा असतो; आणि एक होलिका आहे, जी अहंकार, मत्सर आणि रागाच्या रूपाने आपल्यालाच जाळण्याचा प्रयत्न करते. आजची तरुण पिढी वेगाने बदलणाऱ्या जगात जगते आहे. मोबाईलच्या पडद्यामागे नाती तयार होतात आणि तुटतात. स्पर्धा, करिअर, तुलना आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक तरुण मनाने थकलेले दिसतात. अशा वेळ...

मुखवट्यांच्या जगातले खरे चेहरे...!

मुखवट्यांच्या जगातले खरे चेहरे...! सुनिल पुणेTM 9359850065. राजकारणातील मित्र, चित्रपटातील चित्र आणि नाटकातील पात्र… हे सर्व पाहताना मनाला भुरळ पडते, टाळ्यांचा कडकडाट होतो, भावना उसळतात; पण त्या सर्व गोष्टींच्या पाठीमागे एक सत्य दडलेले असते की बहुतेक वेळा तात्पुरत्या आणि कृत्रिम असतात. त्या रंगमंचावर झळकतात, पडद्यावर चमकतात, सभागृहात घोषणांनी गाजतात; पण आयुष्याच्या खऱ्या रणांगणात मात्र आपल्या सोबत उभे राहतात ते फक्त आपले जीवलग आणि सच्चे नातलग. राजकारणात मैत्री असते, पण ती बहुतेकदा स्वार्थाच्या धाग्यांनी विणलेली असते. पद, प्रतिष्ठा आणि सत्ता या गोष्टींवर ती उभी असते. कालपर्यंत खांद्याला खांदा लावून चालणारे लोक आज मतभेदांमुळे एकमेकांसमोर उभे ठाकतात. या क्षेत्रातले संबंध हे परिस्थितीनुसार बदलतात. म्हणूनच ते कायमस्वरूपी नसतात. चित्रपटातील चित्र आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते. हिरो हिरोईनचे प्रेम, त्यांची मैत्री, त्यांचे त्याग पाहून आपण भारावून जातो. पण कॅमेरा बंद झाला की त्या भावनांचाही शेवट होतो. पडद्यावरचे हसू, रडणे, प्रेम, हे सगळे अभिनयाचा भाग असतो. नाटकातील पात्र तर अधिकच बोलक...