ती आई सकाळी उठते की, तिच्या उठण्यानेच सकाळ पल्लवित होते,

*ती आई सकाळी उठते की, तिच्या उठण्यानेच सकाळ पल्लवित होते,  ह्या वाक्यात केवढं मोठं सत्य लपलं आहे!*

*आई* म्हणजे घराचा आत्मा, घरातली पहाट, घरातला सूर्यप्रकाश.
आपण झोपेत असतो तेव्हा तिच्या पावलांचा आवाज नकळत कानावर पडतो,  तव्यावर चहा ठेवतानाचा आवाज, स्वयंपाकघरातल्या वाफाळत्या कुकरचा शिट्टी, कपाळाला लावलेलं कुंकू आणि गाभाऱ्यातल्या घंटीचा टिणटिणाट... हाच तर आपला पहिला अलार्म!

*आईला* कुणी जागं करत नाही.
ती स्वतः जागते, आणि तिच्यासोबत जागं होतं सगळं घर.
तिच्या हातून चहा घेतल्यानंतरच दिवस खरंच सुरु झाल्यासारखा वाटतो.
ती अंगण झाडते तेव्हा घराला जणू शुभ्र शांती लाभते.
ती देवापाशी हात जोडते तेव्हा घरात एक भक्तिभाव दरवळतो.

*आई* स्वतःसाठी काही मागत नाही,
पण सगळ्यांचं काही ना काही तिच्या मनात असतं, 
मुलाच्या परीक्षा, मुलीचं आजारपण, नवऱ्याचं जेवण, सासूचं औषध...
आपण विसरतो, पण आई नाही विसरत.

*आईसारखी* दुसरी कोणतीही सकाळ नसते.
जिच्या हातून अन्न मिळतं, आशीर्वाद मिळतो, आणि
ज्याचं प्रेम शब्दांत मावत नाही, ती म्हणजे आपली आई.

आजवर विचार केला नव्हता, 
*आई* सकाळी उठते की तिच्या उठण्यानेच सकाळ होते!
पण हे खरं आहे,
कारण आईच्या अस्तित्वामुळेच आपल्या आयुष्याला सूर्योदय मिळतो.

सप्रेम लेखन,
सुनिल पुणे TM 9359850065

"*आई* आवडली तरच लाईक करा हं....नंतर करीन, वेळ नाही, अस असेल तर नका करू लाईक......धमकी"

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?