प्रेमापेक्षा जास्त… एक सच्चा मित्र/मैत्रीण!

*"प्रेमापेक्षा जास्त… एक सच्चा मित्र/मैत्रीण!"*
✍️  सुनिल पुणे TM 8007939422

*आपल्या जीवनात प्रेमाचं स्थान मोठं असतं.* प्रेमात भावना असतात, आकर्षण असतं, ओढ असते… पण या साऱ्या गोष्टींपेक्षा वरचढ एक नातं असतं,  मैत्रीचं!
मैत्री म्हणजे फुलासारखी नाजूक आणि पर्वतासारखी मजबूत. मैत्री म्हणजे प्रेमापेक्षाही खोल, नि:स्वार्थ आणि स्थिर.

प्रेमात कधी अपेक्षा असतात, पण सच्च्या मैत्रीत असतो तो फक्त स्वीकार!
आपण जे आहोत, तसेच आपल्याला कोणीतरी संपूर्णपणे स्वीकारतो… त्या मैत्रीत!
कधी आपण तुटतो, हरवतो, अडखळतो… तेव्हा प्रेम कधीकधी दूर जातं, पण सच्चा मित्र/मैत्रीण मात्र आपल्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये स्वतःला भिजवतो!
प्रेम विसरलं जातं, पण सच्ची मैत्री हृदयात कायमची कोरली जाते.

असा मित्र किंवा मैत्रीण ज्याच्यासोबत आपण न बोलताही संवाद साधू शकतो,
ज्याच्यापुढे आपली लाज, भीती, अहंकार… सारं काही फेकून देतो,
जो/जी आपल्यासाठी वेळ काढतो, न बोलता आपले दुःख समजतो…
तो/ती प्रेमापेक्षाही मोठा असतो/असते.

खऱ्या मैत्रीचं सौंदर्य असतं की, त्यात वासनेचा गंध नसतो, पण भावनेचा सुगंध असतो.
हे नातं आपल्या आत्म्याला स्पर्श करतं.
प्रेम कधी तुटतं… पण मैत्री! ती फक्त गुंतत जाते, बहरत जाते…

आपल्या आयुष्यात असा/अशी एकजण असलाच/असली पाहिजे, 
जो/जी प्रेमापेक्षा ही जास्त महत्वाचा/महत्वाची असेल.
जो/जी आपल्याला न बदलता, तसंच स्वीकारतो/स्वीकारते…
ज्याचं/जिचं अस्तित्व फक्त सोबत राहण्यासाठी असतं, नव्हे, 
आपल्यातला खरा "आपण" जपण्यासाठी असतं!

असाच एक मित्र वा मैत्रीण… आयुष्याची खरी कमाई असतो/असते.
प्रेमाने हृदय जिंकता येतं…
पण मैत्रीने आत्मा! ❤️

*तुमच्यासारख्या प्रत्येक संवेदनशील मनाला समर्पित!*

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?