चांगली माणसं सोबत असली की, वाईट दिवस पण छान वाटू लागतात…
*चांगली माणसं सोबत असली की, वाईट दिवस पण छान वाटू लागतात…*
✍️ Sunil Pune TM 8007939422.
*आयुष्य म्हणजे एक प्रवास…* सुखदु:खाच्या, चढ-उतारांच्या आणि अनपेक्षित वळणांच्या रस्त्याने चालत जाणारा हा प्रवास कधी सरळसोट असतो, तर कधी कठीण वाटणारा. पण या प्रवासात एक गोष्ट आपल्याला आधार देते, सावरण्याची ताकद देते, ती म्हणजे "चांगली माणसं".
वाईट दिवस हे कोणाच्याही आयुष्यात येतात. एखादी अडचण, अपयश, मानसिक खच्चीकरण, किंवा आपल्याच जवळच्यांची साथ सोडून जाणं… या काळात मन अगदी गोंधळून जातं. जगणं निरस वाटू लागतं, हसणं विसरून जातो आपण. पण अशा वेळी जर आपल्या भोवती काही चांगली, समजूतदार, दिलखुलास आणि प्रेमळ माणसं असतील, तर ते वाईट दिवसही काहीसं हलकं वाटू लागतात.
चांगली माणसं म्हणजे काय? हे ते लोक असतात जे तुमच्यावर संकट आलं की पाठीवर हात ठेवतात, जे तुमच्या मनातली निराशा न वाजवता ऐकून घेतात, जे नुसत्या उपस्थितीने तुमच्या दुखण्यावर फुंकर घालतात. ते तुमचं दु:ख संपवत नाहीत, पण त्यावरचं ओझं थोडं हलकं करतात.
या चांगल्या माणसांचं काहीवेळा बोलणं लागतं, कधी त्यांच्या डोळ्यातलं प्रेम दिसतं, तर कधी त्यांच्या खांद्यावर ठेवलेली तुमची मान सावरण्याचं काम करत असते. एखादा चहा त्यांच्यासोबत घेतल्यावरसुद्धा मनातली काळोख पुसून जातो. आणि मग ते वाईट दिवससुद्धा ‘एक अनुभव’ वाटू लागतात, शिकवण देणारे क्षण वाटू लागतात.
कधी वाटतं, “हे सगळं मी कसं पार करणार?”, पण मग कोणीतरी आपल्या पाठीशी उभं राहतं आणि म्हणतं, “मी आहे ना…”, बस, हेच पुरेसं असतं. हे चांगले लोक एखाद्या वादळात सावरणारी खोलवर रुजलेली झाडं असतात, ज्यांच्या सावलीत आपण काही क्षण विसावतो.
म्हणूनच म्हणावंसं वाटतं,
"वाईट दिवसांना हरवण्याची ताकद कदाचित वेळेत नसेल, पण चांगल्या माणसांच्या साथीत नक्कीच असते."
तेच माणसं आयुष्याचा खरा ठेवा असतात. त्यांना जपा, त्यांचं ऐका, आणि जमल्यास अशा चांगल्या माणसांत स्वतःलाही घडवा, म्हणजे कोणाच्यातरी वाईट दिवसात, आपण त्यांच्यासाठी चांगलं क्षण ठरू शकू…
🌿
सुनिल पुणे TM 9359850065,
sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment