प्रेमग्रंथ : विश्वासाचे मौन असले की प्रेम बोलके होते...
*प्रेमग्रंथ : विश्वासाचे मौन असले की प्रेम बोलके होते...*
सुनिल पुणे™
9359850065 sunilpunetm.blogspot.com
प्रेम म्हणजे शब्दांनी व्यक्त होणारी गोष्ट नव्हे,
प्रेम म्हणजे मौनातही ऐकू येणारा आवाज असतो.
जिथं विश्वास असतो, तिथं नजरेतून संवाद घडतो,
शब्दांची गरजच उरत नाही...
मौनच पुरेसं असतं प्रेम उमजवायला. पण जिथं संशय असतो, तिथं शब्दही धारधार भासतात,
'म्हणून'च बऱ्याचशा प्रेमकथा शब्दांमध्येच संपुन जातात,
आणि काही मौनाच्या समजुतीत अजूनही जपल्या जातात...खऱ्या प्रेमात ना हट्ट असतो, ना स्पष्टीकरणाची गरज,
कारण दोघांच्या मनात असतो एक नाजूक विश्वासाचा धागा,
जो न दिसता, न तुटता, नक्की जोडत राहतो.
हा धागा एकदा मनातून जुळला,
की मग नातं तक्रारींपेक्षा समजुतीचं होतं.
प्रेम म्हणजे रोज ‘आय लव्ह यू’ म्हणणं नाही,
तर रोज ‘तू आहेस माझ्यासोबत’ हा भाव जपणं असतं...कधी नजरानजर, कधी हसण्यामध्ये, तर कधी न बोलताही प्रेम उमजतं, फक्त विश्वास हवा…जर त्या दोघांमध्ये “मी तुझा आहे” आणि “तू माझी आहेस” हा विश्वास टिकून राहिला,
तर नातं काळाच्या कसोटीवरही भक्कम ठरतं...कारण शेवटी प्रेम म्हणजे स्पर्श नव्हे,
तर हृदयातली जागा असते,
जी एकदा मिळाली की शब्दही ओले होतात,
आणि मौनही गाणं बनते.
सुनिल पुणे™
9359850065. sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment