नकळत माझे मन तुझ्या प्रेमात पडल
*"नकळत माझे मन तुझ्या प्रेमात पडल…"*
✍️ लेख: सुनिल पुणे TM 8007939422
नकळतच सोशल मिडियावर सुरुवात झाली…
ओळख साधी, विडीयी व फोटो नजरभेट छान आणि संवाद अगदी साधेपणाचा…
पण या सगळ्या साधेपणामागे एक गोड ओढ दडलेली होती…
तुझ्या बोलण्यातला मृदुता, हास्याच्या रेषेतला विश्वास,
आणि नजरेतला न बोललेला जिव्हाळा
कधी मनाच्या कोपऱ्यात घर करून गेला,
ते कळलंच नाही…
प्रत्येक दिवसात तुझी आठवण एक नवीन अर्थ घेऊन येते.
तुझ्या नावाशिवाय मन शांत राहत नाही…
तू जवळ नसलीस तरी तुझी चाहूल मनात सतत असते.
हृदय हे नकळतच तुझं नाव घेतं…
आणि प्रत्येक धडधडीत तुझीच आठवण घोळते…
प्रेमाची कबुली कुठेच दिली नाही मी,
तरीसुद्धा माझं प्रत्येक वागणं तुझ्यावरचं प्रेम बोलून जातं.
तू समोर आलीस की शब्द सैरावैरा होतात,
पण डोळे मात्र सारे काही सांगून जातात…
तुझ्या प्रत्येक "कस आहेस?" मध्ये एक काळजी लपलेली असते,
तुझ्या हसण्यात एक आश्वासन असतं,
"मी आहे तुझ्यासोबत… कायमच…"
आणि त्या क्षणी वाटतं ,
हो… नकळतच, पण पूर्ण मनानं,
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे…
हे प्रेम मोठं साधं आहे…
हक्क न करता समजून घेणं…
मिळाल्यास आनंद, पण न मिळाल्यास तक्रार नाही…
कारण प्रेम हे मागणीचं नसतं,
ते नजरेतून उमजण्याचं असतं…
आयुष्याच्या प्रवासात तू कुठेही अस,
माझ्या आठवणीत मात्र नेहमीच असशील…
प्रेमाचे शब्द कधी तुझ्यापर्यंत पोहोचतील की नाही माहित नाही,
पण माझं मन मात्र नेहमी सांगेल,
"नकळत… मी तुझ्यावर प्रेम करत गेलो…"
तुमचाच,
सुनिल पुणे TM 🌸💌
Comments
Post a Comment