विधवा वा विधुराशी पुनर्विवाह एक संवेदनशील व वास्तववादी विचार*

*विधवा वा विधुराशी पुनर्विवाह  एक संवेदनशील व वास्तववादी विचार* सुनिल पुणेTM 8007939422

आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत विवाहसंस्थेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये सामंजस्य, सहनशीलता आणि समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो. भारतीय व ब्रिटिश कायदे विशेषतः महिलांच्या बाजूने झुकलेले असल्याने, अनेकदा विवाहामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा शेवट फारकतीत होतो. मेंटेनन्स, कौटुंबिक वाद, आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होतात.

परंतु, आयुष्यात एखादा विवाह मोडला आणि नव्याने आयुष्य सुरु करायचेच असेल, तर एक विचार करायला हवा  अशा वेळी आपण आपल्या सारख्याच वेदना अनुभवलेल्या एखाद्या विधवा किंवा विधुराशी गाठ बांधणे हे अधिक समंजस आणि संवेदनशील पाऊल ठरू शकते.

विधवा वा विधुर व्यक्तींना आयुष्याचा खरा अर्थ, सहचराची किंमत, आणि नात्याचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजलेले असते. त्यांच्या वेदनेतून त्यांनी सहनशीलता, प्रेम आणि आपुलकीचा अर्थ आत्मसात केलेला असतो. अशा जोडप्यांमध्ये परस्पर सन्मान, मूक समजूत आणि परिपक्वता असते.

हे नातं केवळ दोन व्यक्तींचं नसतं, तर दोन आयुष्यांच्या नव्या सुरुवातीचं प्रतिक असतं  समाजालाही एक सकारात्मक संदेश देणारं असतं.

म्हणूनच, जर आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा साथ हवी वाटत असेल, तर ज्यांनी खऱ्या अर्थाने एकटेपण अनुभवले आहे अशा व्यक्तीची निवड करा.

ही केवळ एक वैयक्तिक निवड नसून, एक सामाजिक जबाबदारी देखील आहे.

तुमचाच,
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"