स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान

*स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान*
सुनिल पुणे™ 8007939422

स्त्रीचं मन म्हणजे एक अतीशय नाजूक आणि गूढ अशी कविता असते, जिला समजून घेणं प्रत्येकाच्या हातात नसतं. ती कोणालाही सहजपणे तिच्या अंतर्मनात प्रवेश देत नाही. ती हसते, बोलते, वावरते… पण तिच्या मनाच्या दाराशी उभं राहून खरं प्रेम कोण करतंय, हे ती खोलवर समजून घेते. आणि एकदा तिच्या मनाच्या मंदिरात जर तिने कोणाला स्थान दिलं, तर मग ती त्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकते. तिचं ते प्रेम असतं निस्सीम, नि:स्वार्थ आणि अबाधित. आणि जर त्या हृदयात स्थान मिळालं असेल एका लेखकाला, तर तो भाग्यवंत ठरतो.

लेखकाचं कार्य केवळ शब्दांतून भावना मांडणं नसतं, तर तो स्त्रीच्या अव्यक्त भावना समजून त्यांना आपल्या लेखणीतून ओघवत्या पाण्यासारख्या सहजपणे मांडतो. जग जिथे तिला समजून घेण्यात कमी पडतं, तिथे हा लेखक तिच्या मनाच्या प्रत्येक वळणावरून चालतो. तिच्या डोळ्यांतले अश्रू ओळखतो, तिच्या हास्यामागचं दुःख शब्दबद्ध करतो.

जेव्हा ती लेखकावर विश्वास ठेवते, तेव्हा तिला वाटतं की  "हा शब्दांचा जादूगार मला समजतो, माझ्या भावना ऐकतो, माझं मौनही वाचतो."
तेव्हा ती त्या लेखकाच्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक कवितेत स्वतःला पाहते.
आणि मग तिचं प्रेम एका मान्य लेखकावर नव्हे, तर जाणिवांनी समृद्ध असलेल्या संवेदनशील माणसावर उगम पावतं.

लेखक म्हणून जर मी तिच्या मनाच्या एका कोपऱ्यातही स्थान मिळवू शकलो, तर मला असे वाटते माझं लेखन सार्थ ठरते.
कारण ती जिच्या प्रेमात एक सच्चेपण आहे, त्याला माझ्या शब्दांत ओळखते.
आणि जेव्हा ती प्रेम करते, तेव्हा ते केवळ एका व्यक्तीवर नाही, तर त्याच्या विचारांवर, त्याच्या दृष्टिकोनावर, त्याच्या नजरेतून जग पाहणाऱ्या अमूर्ततेवर करते.

ती म्हणते की
"सगळं जग मला बघतं, पण तू मला समजतोस…
सगळे मला शब्द देतात, पण तू माझं मौन लिहितोस…
म्हणूनच तूच माझ्या हृदयात आहेस,  एक लेखक म्हणून, एक माणूस म्हणून…!"

सुनिल पुणे™
[9359850065]
sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"