स्त्रीचं अंतर्मन समजून घेतले, तर आयुष्य सुंदर होतं, हेच वास्तव आहे !

*स्त्रीचं अंतर्मन समजून घेतले, तर आयुष्य सुंदर होतं, हेच वास्तव आहे !*
लेखक – सुनिल पुणे TM 8007939422

आज जग विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलंय, चंद्रावर माणूस गेला, डिजिटल जग सुध्दा बदललं... पण अजूनही एक गोष्ट समाज पूर्णपणे समजून घेतलेली नाही, ते म्हणजे "स्त्रीचं अंतर्मन".

पुरुषप्रधान समाजात स्त्रीला नेहमी समजून न घेता "भावनिक", "कमकुवत", "चिकट", "तक्रार करणारी" अशा टॅग्समध्ये बंद केलं गेलं. पण खरंतर, स्त्रीचं मन हे महासागरासारखं विशाल, खोल आणि खूप नाजूक आहे. ते फक्त ऐकून समजत नाही, ते ‘मनापासून समजून घेतल्यावर’ उमगतं बरर, हे मला "सुनिल पुणे" ला समजले म्हणून हा लेख विचारपूर्वक लिहितोय कारण माझे पुरूष मित्र नाराज होतील आणि मला काय म्हणतील हे अभिप्रायातुन कळेलच 

एक स्त्री खरोखर काय शोधते हो ! तर ती तुमच्याकडून पैसा, स्टेटस किंवा गाडी नाही मागत. ती केवळ दोन गोष्टी मागते, "समजूत" आणि "साथ". तिला वाटतं "कोणी आहे का जो माझं ऐकेल?
जो मला दोष न लावता माझं दुःख समजून घेईल?
जो माझ्या डोळ्यातील पाणी, दुख वाचेल, आणि मी बोलायच्या आधी माझ्या मनातील आंदोलन, दुख जाणेल?" होय हेच खरय म्हणून ज्या पुरुषाला हे समजते, जमते, तोच खरा प्रियकर, तोच खरा पती होतो.

आणि भांडणं होतील, पण दुरावा नसेल...

कारण समजूत असली की भांडणं ‘एकमेकांपासून’ नाही होत, ती ‘एकत्र’ सोडवण्याची असतात. त्या भांडणांतही प्रेम असतं. ज्याला स्त्रीचा मूड समजतो, तिचं दुःख न विचारता वाचता येतं, त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत जातच नाही.

स्त्रीला काय हवे असते तर भावनात्मक सुरक्षा पण "जगाने आजपर्यंत ‘स्त्रीच्या शारीरिक सुरक्षेवर खूप चर्चा केली, पण भावनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं आहे व तेच सत्य आहे ."

एक स्त्री जेव्हा तुमच्याशी काही शेअर करते की, ती उदास आहे, तिला भीती वाटते आहे, एकटे वाटते आहे,  तेव्हा तिला सल्ला नको असतो, तिला फक्त तुम्ही शांत ऐकणं आणि समजून घेणं हवं असतं.

‘प्रेमविवाह’ किंवा ‘ठरवून लग्न’, फक्त एक मार्ग आहे...पण त्या प्रवासात जर तुम्ही तिच्या अंतर्मनाशी जुळलात, तर तुम्ही तिला तिचं खरं घर देता.
तिला रोज काय हवं असतं माहितीये का? तर तिचं ऐकणं,  तिला appreciate करणं, तिचे स्वप्न, तिच्या चुकाही समजून घेणं, ती आई असेल, प्रेयसी वा बायको असेल, मुलगी असेल तिच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक करणं


पुरुषांनो, एक विनंती आहे...तुम्ही तिला गिफ्ट्स द्या, फिरायला न्या हे छानच.
पण तिला तुमचं ‘attention’, तुमचं ‘समजून घेणं’, तुमचं ‘मूक सहकार्य’ द्या.
ते आयुष्यभर लक्षात राहतं. कारण *स्त्रीचं हृदय हे ताजं फुल असते जपलं, तर दररोज दरवळतं; दुर्लक्ष केलं, तर कोमेजून जाते.*

जागतिक सर्वात मोठा बदल काय असू शकतो?
तो म्हणजेच, पुरुषांनी स्त्रीच्या भावनांना किंमत देणं शिकणं.
ते झालं, की मग जगात भांडणं कमी होतील, प्रेम वाढेल, आणि ‘घटस्फोट’ हा शब्दच विसरला जाईल!

सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(35 वर्षांचा अनुभव, फक्त कॅमेरातून नव्हे, तर मनातून स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करणारा एक साधा लेखक)


वरिल हाच विचार एका पुरुषाच्या मनात रुजला, तर हजारो स्त्रिया 'समजल्या गेल्याचं' समाधान घेऊन जगतील... आणि जग खऱ्या अर्थाने सुंदर बनेल!

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?