ती आणि तिचे इंद्रधनुष्याचे सात रंग"*

*"ती आणि तिचे इंद्रधनुष्याचे सात रंग"*
लेखक: सुनिल पुणे TM 9359850065

आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात, ज्या फक्त आपले जीवन सुंदर करतातच असं नाही, तर त्या आपल्या अस्तित्वालाही एक नवीन रंग देऊन जातात. जणू काही त्या इंद्रधनुष्याचे रंग घेऊनच आपल्या आयुष्यात उतरतात...

ती अशीच आली होती...
नाही, ती चालत नव्हती आली, ती तर माझ्या मनाच्या पाऊलवाटांवर स्वप्नांचं इंद्रधनुष्य घेऊन उतरली होती. तिच्या हास्यातला पिवळसर उत्साह, तिच्या डोळ्यांतला निळसर स्वप्नाळूपणा, तिच्या स्पर्शातलं हिरवंचं आश्वासन आणि तिच्या शांततेत लपलेला जांभळा गूढपणा... ह्या सगळ्याने माझं संपूर्ण आयुष्य रंगून गेलं.

तिच्याशी बोलताना, जणू शब्दांच्या पलिकडल्या गूढ रंगांमध्ये मी हरवून जायचो. ती काही मोठं काही बोलत नसे, पण तिच्या प्रत्येक साध्या वाक्यात एक भावनिक लालिमा असायचा तो जो माझ्या मनाला उब देत होता. कधी कधी वाटायचं, ही स्त्री एक व्यक्ती नसून, एका सुंदर ऋतूची साक्षात झलक आहे कारण जी एकाच वेळी शांतही आहे, आणि झपाटणारीही!

आणि हो… तिच्यामुळे मला समजलं, की खरं प्रेम म्हणजे ‘तुला बदलण्याचा प्रयत्न’ नाही, तर ‘तुझ्यात मिसळून तुझंच होण्याची तयारी’ असते. मी हळूहळू तिच्या रंगांमध्ये मिसळू लागलो आहे आणि मग मी 'मी' राहिलोच नाही… मी 'तिचा' झालो.

माझ्या जगण्याचे सारे रंग आता तिचेच झाले आहेत. माझ्या आयुष्याचं कॅनव्हास तिच्या आठवणींनी भरलेलं आहे, आणि त्या रंगात अजूनही मी रंगून आहे गेलोय  कायमचा!

ती जर का वाचत असेल तर…
हो, तूच आहेस ती!
जिच्या इंद्रधनुष्यात हरवून मी आजही रंगून आहे… आणि मला खात्री आहे, हे वाचून अनेक स्त्रियांच्या मनात एकच विचार येईल असेल " तु का नाही भेटला मला असाच कुठे तरी…!"

सुनिल पुणे TM 8007939422, sunilpunetm.blogspot.com 
(प्रेमात रंगवणारा एक कलाकार...) 🎨❤️

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"