"सासू-सून आणि गाठोड्याची गाठ!"

*"सासू-सून आणि गाठोड्याची गाठ!"*
लेखक सुनिल पुणे TM

एक वेळ अशी असते की एखादी मुलगी लग्न होऊन घरात सून म्हणून येते… आणि हळूहळू तिचं लक्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतं, सासूबाई म्हणजे बाईंचं मूळ रूप!

सासूबाईंना वाटतं, "आपली सून म्हणजे जरा शांत, सुसंस्कृत, आपली काळजी घेणारी, स्वयंपाकात निपुण आणि मोठ्या माणसांची सेवा करणारी असावी…"
पण सूनचं म्हणणं असतं, "हे घर म्हणजे माझं सुद्धा आहे, सासूबाई म्हणजे माझ्या आईसारख्या असाव्यात, माझ्या चुकांवर ओरडू नयेत, आणि WhatsApp वर ‘गुड मॉर्निंग’ तरी रिप्लाय द्यावा!"

पण गंमत बघाच ज्या बाईने सासूबाईची खस्ता खाल्ली, तीच एक दिवस सासूबाई बनते आणि मग काय...
"हिच्यासारखीच दुसरी एक आली का घरात!" असं तिनं स्वतःच्या सूनबाईविषयी सांगायला सुरुवात केली की पिढ्या पूर्ण वर्तुळात आल्यासारखं वाटतं. आणि हाच विनोदाचा क्लायमॅक्स!

सासूबाईंचं म्हणणं:
"आमच्या वेळी आम्ही नुसतं हसू लागलो तरी सासूबाई विचारायच्या, काही काम नाही का? आणि ही माझी सून तर माझ्यासमोरच मोबाईल वर reels बघते… आणि वर ती म्हणते ‘किती गोड आहे ना हे क्यूट कपल!’"

सूनबाईंचं म्हणते
"सासूबाई म्हणतात मी काहीच करत नाही… पण त्यांनी दिवसभर फोनवर शेजारच्या काकूंशी चालणारी गॉसिप गृहीत धरलेली नाही." आणि गंमत म्हणजे, दोघींनाही एकमेकांमध्ये स्वतःचं जुनं रूप दिसतं!
सासूबाई म्हणतात, "आपल्या सूनसुद्धा आपल्यासारखीच आहे…"
आणि सूनबाई मनात म्हणते, "ही माझ्यासारखी कधीच नव्हती!" आणि शेवटी काय होतं?
सासू-सून हे नातं म्हणजे दोन कुंड्यांमध्ये वाढणाऱ्या झाडासारखं असतं.
थोडं पाणी, थोडं ऊन, थोडं खत आणि थोडं सहनशीलतेचं औषध दिलं की दोघींचं नातं पण फुलतं! पण नातं जरी फुललं तरी एक गोष्ट मात्र कायम विनोदीच राहते, "ज्यावेळी एखादी बाई सून असते, तिला सासू पटत नाही... आणि तीच बाई सासू झाल्यावर, सून काही केल्या पटत नाही!" आयुष्यभरचा हा विनोदी संघर्ष बघताना एकच वाटतं, 
"सासू-सून नातं म्हणजे एक न संपणारा Daily Soap… पण TRP कायम टॉपवर!" 😄

तुमचं हसू थांबलं नसेलच!
सुनिल पुणे TM 9359850065. sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?