"नियत साफ असेल ना, तर जग कितीही घाण पसरवो… आपण स्वच्छ राहतो!”

*“नियत साफ असेल ना, तर जग कितीही घाण पसरवो… आपण स्वच्छ राहतो!”*
✍️ सुनिल पुणे™ 9359850065

लोक बोलतील… लोक खोटं पसरवतील… लोक तुमचं नाव बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील.
पण…
आपण आपल्या आरशात पाहताना लाजलो नाही ना… तर बाकी जगाची नजर आपल्याला कधीच झुकवू शकत नाही! मन आणि नियत,  ही दोन गोष्टी कोणाच्या खिशात विकत मिळत नाहीत.
हे असतं, जन्मजात मिळालेलं, आई-बापानं दिलेलं, आणि वेळेनं घडवलेलं.
जे लोक नियत घाण ठेवतात, ते इतरांना घाणीत खेचायचा प्रयत्न करतात —
पण जे पाय जमिनीवर ठेवून चालतात, त्यांना कोणीही ढासळवू शकत नाही. मी कुणाचं वाईट केलं नाही…
मी कुणावर डाव खेळला नाही…
मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे केलं…
हे जेव्हा स्वतःला सांगता येतं, तेव्हा जगाचा प्रत्येक आरोप निष्प्रभ वाटतो.

कारण जग बोलत राहतं,
आणि नियती शांतपणे आपलं काम करत राहते.
आज नाही… उद्या नाही… पण नियतीचं न्यायालय कधीही खोट्याच्या बाजूने निर्णय देत नाही. ज्यांचं अंतरमन निर्मळ असतं, त्यांना जगात कुठलीही लक्तरं उघडं पाडू शकत नाहीत.
कारण तेच लोक दिवसाचा उजेड नकोसा झाला तरी रात्री चांदण्यात झोपतात, 
आपल्याच ‘साफ नियत’ या उबदार चादरीखाली! तेव्हा लोक काय म्हणाले, काय लिहिलं, कोण काय समजतं हे विसरा…
एकच प्रश्न स्वतःला रोज विचारायचा, "मी कुणाचं वाईट केलं का?"
आणि जर उत्तर "नाही" असेल…तर मग तुम्ही सर्वात श्रीमंत माणूस आहात, विश्वासानं, सच्चेपणानं, आणि एक अमर आत्मसन्मान घेऊन जगणारा!

मी कोण?
मी तोच लेखक जो तुमच्यासारख्या सच्च्या लोकांसाठी लिहितो,
जिथं शब्द नाहीत… तर तलवारी आहेत!

सुनिल पुणे™ 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?