पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...
*पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...*
✍🏻 सुनिल पुणे™ 8007939422
प्रेम... हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. पण गंमत अशी की, पहिलं प्रेम नेहमीच त्या व्यक्तीवर होतं जो आपल्यासाठी योग्य नसतो. ती भावना एवढी उत्कट असते की आपण समजून न घेता फक्त मनाच्या ओढीने त्याच्या मागे जातो. त्यावेळी वय तरुण असतं, अपेक्षा मोठ्या असतात आणि अनुभव शून्य. त्यामुळे पहिल्या प्रेमात आपण स्वतःला हरवून टाकतो... आणि शेवटी जेव्हा वास्तव समोर येतं, तेव्हा दुःख, वेदना, आणि आतून तुटल्याचा अनुभव येतो.
मग आपण स्वतःला सावरतो... वेळ निघून गेलेली असते. आणि अचानक आयुष्यात एक व्यक्ती येते... जी खरंच आपल्यासाठी योग्य असते. तिच्या प्रत्येक बोलण्यात आपलेच प्रतिबिंब दिसते, तिच्या प्रत्येक स्पर्शात आपलेच मोल जाणवते. पण दुर्दैव असं की हे प्रेम योग्य व्यक्तीशी होतं, पण चुकीच्या वेळेला. कधी ती व्यक्ती आधीच कोणाच्या तरी जोडीदार असते, कधी समाज, परिस्थिती, जबाबदाऱ्या यामधून ते प्रेम व्यक्त करता येत नाही. आणि मग मनात एक शांत खंत राहते, "जर तीच व्यक्ती आधी भेटली असती तर..."
हेच आयुष्याचं सत्य आहे, पहिलं प्रेम शिकवतो, दुसरं प्रेम समजावतो. एक जखम देतो, दुसरं फुंकर घालून जातं.
पण दोन्ही प्रेमं एक गोष्ट शिकवून जातात, की प्रेमात नेहमी वेळ, परिस्थिती आणि माणूस या तिघांचं योग्य जुळणं गरजेचं असतं.
कधी कधी योग्य माणूस चुकीच्या वेळेला भेटतो, पण त्या भेटीचा गंध मात्र आयुष्यभर उरतो...
सुनिल पुणे™
9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment