Posts

Showing posts from May, 2025

डिजिटल युगातील एक पुरुषप्रधान पत्र : एका स्त्रीची शोकांतिका

*डिजिटल युगातील एक पुरुषप्रधान पत्र : एका स्त्रीची शोकांतिका* (लेखक : सुनिल पुणे TM 8007939422 ) प्रिय मैत्रिणी, तुला पहिल्यांदा पत्र लिहितोय... तेही डिजिटल युगात, पण भावनांच्या अश्रूंनी ओलावलेलं हे पत्र आहे... तुझ्या दु:खाने मन सुन्न झालंय. लग्नानंतर तुझं आयुष्य नव्या वाटेवर चाललं, आणि एक दिवस तू आनंदाने सांगितलंस,  "आई झाले गं!" आम्ही सारे हरखून गेलो. पण जेव्हा कळलं की तू मुलीला जन्म दिलास, तेव्हा तुझ्या घरातील प्रतिक्रिया ऐकून काळीज हेलावलं. तुझ्या सासूबाई नकळत बोलून गेल्या  *"मुठभर माती कमी पडली...नाही तर मुलगा झाला असता"* या एका वाक्यात त्यांनी तुझ्या नवजात बाळाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावलं... कसली माती? कोणती माती? आणि का कमी पडली? त्यांना "मुलगा" हवा होता, म्हणून! कारण ही समाजाची खोलवर रुजलेली पुरुषप्रधान मानसिकता आहे. आज डिजिटल युगात आपण AI, 5G, ड्रोन आणि मंगळावर पोचल्याचा अभिमान बाळगतो, पण अजूनही बाळगोपाळाच्या लिंगावरून माणसाची किंमत मोजली जाते. सामाजिक वास्तव काय सांगतं? अजूनही अनेक कुटुंबांमध्ये मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, तर मुलगी म्हणजे खर्...

अडचणीत तिला साथ दिली, म्हणून ती साथ आयुष्यभराची झाली

*"अडचणीत तिला साथ दिली, म्हणून ती साथ आयुष्यभराची झाली"* (लेखक: सुनिल पुणे TM 8007939422) आपल्या आयुष्यात अनेक नाती येतात, काही थोडा वेळ सोबत राहतात, काही कायमस्वरूपी आपल्यात मिसळून जातात. पण एक नातं असं असतं, जे एकदा जोडलं की त्यात विश्वास, माया, त्याग, समर्पण, आणि न बोलता समजून घेण्याची ताकद असते,  ते म्हणजे "स्त्री"चं नातं. एखादी स्त्री जेव्हा तुमच्या आयुष्यात येते, ती फक्त सौंदर्य घेऊन येत नाही, तर मनामधील मायेचा झरा घेऊन येते. ती तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते, तुमच्या आवडीनिवडी सांभाळते, आणि तुम्ही कधीच बोलून दाखवलं नाही तरी तुमच्या मनातली दुखणी ओळखते. पण खरं प्रेम, खरं आपुलकी, आणि खरं नातं तेव्हाच सिद्ध होतं… जेव्हा अडचणींचा डोंगर तुमच्यासमोर उभा राहतो. घरात आर्थिक संकटं असो, मानसिक ताण असो, समाजाकडून मिळणारा विरोध असो, किंवा अपयशाच्या वेदना असोत,  त्या सगळ्या क्षणांत जर ती स्त्री तुम्हाला सोडून गेली नाही, तर तिचं प्रेम नशिबाचं नव्हे तर आयुष्याचं वरदान आहे. अशी एखादी स्त्री, जी तुमच्या अडचणीत उभी राहते, कधी तुमच्यासाठी समोर ताटात अन्न घालते आणि स्व...

स्त्री – भावना, बळ आणि अस्तित्वाचा गूढ प्रवास

*"स्त्री – भावना, बळ आणि अस्तित्वाचा गूढ प्रवास" ✍️ सुनिल पुणे TM 8007939422* *स्त्री म्हणजे केवळ शरीर नव्हे, ती एक भावना आहे…* एक नाजूक कवचात लपलेली जिद्द आहे… एक सतत वाहणारा त्यागाचा झरा आहे. ती क्षणभर प्रेयसी असते, जीवनभर पत्नी असते… पण एकदा आई झाली की, ती काळाच्या पलीकडे आपलं अस्तित्व विसरून आपल्या अपत्यासाठी स्वतःला वेचून टाकते. अपत्याला संस्कारित, सक्षम आणि सभ्य नागरिक घडविण्याची तिची धडपड म्हणजे एक तपश्चर्याच असते. स्वतःची झोप, आवड, सौंदर्य, वेळ... सगळं बाजूला ठेवून ती फक्त एक ‘आई’ होते. सहजीवनात साथ मिळाली, तर ती फुलते; नाही मिळाली, तरी न डगमगता झिजत राहते. घरातील इतर नातेसंबंध,  आईवडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण, सगळ्यांना आपल्या मायेचा गंध देत ती आपली भूमिका निभावत राहते. आणि वयाची उतरती वाटचाल सुरु झाली की, एखाद्या दिवशी ती स्वतःसाठी काहीतरी करायला लागते,  एखादा छंद, एखादी कविता, एखादं हसू,  तेव्हा समाजाला ती ‘जगणं’ पचत नाही! "स्त्री आहेस, स्त्रीसारखंच वाग!" "घरातलं काम तुझं आहेच ना!" "एवढं हसणं बरं दिसतं का!" ही वाक्यं स्त्रीला दिवसातून अन...

ती... तिचं मन... आणि एक न कळणारं विश्व

*"ती... तिचं मन... आणि एक न कळणारं विश्व"* लेखक: सुनिल पुणेTM 8007939422. *ती दिसते शांत... पण तिच्या मनात दररोज शंभर विचारांची गर्दी असते.* ती हसते मनापासून... पण तिचं हसणं हे तिच्या मनाच्या हजारो भावना लपवून ठेवलेलं नकळत मुखवटं असतं. ती झुंजते,  प्रेमासाठी, घरासाठी, अस्तित्वासाठी. पण तिची ही झुंज कुणाला कधी दिसत नाही. ती बायको असते, आई असते, सून असते, बहिण असते,  पण या सगळ्या नात्यांच्या पलीकडे ती एक "स्त्री" असते, एक "मन" असते, जिचंही एक कोमल, प्रेमळ, आणि खूप स्वप्नाळू जग असतं... तिच्या मनातही कुणाचं तरी प्रेम जपलेलं असतं,  कधी व्यक्त झालेलं, कधी मनातच ठेवलेलं. तिला आजही आवडतो चहा हातात घेऊन गॅलरीत बसणं, तिला आजही हवेत उडणाऱ्या पतंगाकडे पाहून आठवतो आपला पहिला प्रेमपत्र, तिला आजही एखाद्या शब्दावर रडावंसं वाटतं, पण ती स्वतःला सावरते,  कारण "ती कमजोर नाही." ती आई म्हणून झोपत नाही, पण तिच्या मनात अजूनही एक मुलगी लपलेली असते,  जिला कुणीतरी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवावा असं वाटतं. जिला तिच्या कष्टाचं कौतुक हवं असतं,  मोठं काही नाही, फक्त एक "...

आजच्या स्त्रीच्या मनाचा कोंडमारा, आधुनिकतेच्या सावलीत हरवलेलं अस्तित्व

*"आजच्या स्त्रीच्या मनाचा कोंडमारा,  आधुनिकतेच्या सावलीत हरवलेलं अस्तित्व" लेखक – सुनील पुणे TM 8007939423* आजचा काळ डिजिटल आहे, आधुनिक आहे, प्रगत आहे... पण आजच्या स्त्रीच्या मनात एक प्रश्न सतत घोंगावत असतो,  "माझं खरं स्थान समाजात कुठे आहे?" ती लहानपणी वडिलांच्या छायेत वाढते, तारुण्यात पतीच्या आधारावर संसार चालवते, नंतर भाऊ, मुलगा, नातू यांच्या गरजांमध्ये स्वतःला विसरून जाते. पण कधी तिला विचारलं जातं का,  "तुला काय हवंय? तू खुश आहेस का?" हाऊसवाईफ, एक दुर्लक्षित भूमिका घर सांभाळणारी स्त्री म्हणजे घराची मूळ आधारस्तंभ. ती सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, वृद्ध, पाहुणे, स्वयंपाक, साफसफाई यांत गुंतलेली असते. पण तिच्या श्रमांना, तिच्या त्यागाला, तिच्या थकव्याला मान्यता मिळते का? तिचं नाव नसेल पगारपत्रकात, पण तीच खरी "फुल टाइम कर्मचारी" आहे,  अविरत, न थकता. नोकरी करणारी स्त्री,  दुहेरी जबाबदारीच ओझ ती ऑफिसमध्ये काम करते, तिथे टार्गेट्स पूर्ण करते, वेळ पाळते, अधिकार पेलते. पण घरी परतल्यावर तिला “मुलांची आई”, “सुना”, “बायको” या भूमिकांत परत शिरावं लागतं....

"थांबायचं तिथेच... जिथे मनाला आनंद मिळतो"

*"थांबायचं तिथेच... जिथे मनाला आनंद मिळतो" सुनिल पुणे TM 8007939422* आपल्या आयुष्यात अनेक वळणं, अनेक वाटा येतात. काही ठिकाणी आपण क्षणभर थांबतो, काही व्यक्ती आपल्याला थोडा वेळ थांबवतात… पण शेवटी निर्णय आपलाच असतो,  कुठे थांबायचं? आजवरच्या प्रवासात अनेकांनी साथ दिली, काहींनी निरोप दिला, काहींनी भरभरून प्रेम दिलं, तर काही ठिकाणं होती,  जिथं फक्त शांतता होती, पण ती मनाला दिलासा देणारी होती. मनाला खराखुरा आनंद कुठे मिळतो, हे कोणत्याही तर्कावर ठरत नाही. ना ते व्यक्तींच्या दर्जावर ठरतं, ना ठिकाणाच्या वैभवावर. काही वेळा एका साध्याशा चहा टपरीवर मिळालेली मैत्री, किंवा एखाद्या व्यक्तीच्या हास्यातला निरागसपणा,  हेच खरं समाधान देतात. थांबायचं तिथेच, जिथे आपली किंमत शब्दांपलीकडे केली जाते... जिथे आपल्या अस्तित्वाला मान मिळतो, आणि मनाला एक अनामिक शांती. कधी एक गप्पांचा कट्टा, कधी आईच्या हातचा गरम पोळीचा घास, कधी एखाद्या मित्राचा फोन, कधी एका पुस्तकात सापडलेली ओळ,  हे सगळं काहीतरी सांगतं... "थांब इथेच, तू योग्य ठिकाणी आहेस." आणि व्यक्तींच्या बाबतीतही हेच लागू होतं,  जिथे नात्या...

"ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी – बदलती माणुसकीची रूपरेषा!"

*लेख शीर्षक: "ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी – बदलती माणुसकीची रूपरेषा!" लेखक: Sunil Pune TM 8007939422* आज डिजिटल युगात आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत, पण प्रत्यक्ष भेटी मात्र दुर्मीळ झाल्या आहेत. जन्म, वाढदिवस, लग्न, अगदी आनंदाचे क्षणही आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि झूम कॉलवर साजरे होतात. एक काळ होता जेव्हा घरात कोणी आजारी असलं, तर नातेवाईक गावभरून भेटायला यायचे. आज मात्र त्याच्या तब्येतीचा अपडेट ‘स्टेटस’वर दिसतो, आणि ‘जलद बरे व्हा’ अशी कमेंट टाकून आपली जबाबदारी संपते. या वेगवान डिजिटल काळात एक विचार मनात येतो  कदाचित उद्या मृत्यूची बातमीही ऑनलाईनच येईल, आणि अत्यंविधीही झूमवर होईल! कोण जाणे, चार खांदेकरीही आपण डंजो, स्विगी किंवा पोर्टर अ‍ॅपवरून मागवू लागू! मोजक्या वेळात, वेळेवर येणारे आणि नंतर 'ऑर्डर कम्प्लिट' दाखवणारे. हे दृश्य हास्यविनोदी वाटू शकते, पण यामागे एक भीषण वास्तव दडलेलं आहे  माणुसकीच्या नात्यांची तुटलेली वीण. पूर्वी कोणाचं निधन झालं की संपूर्ण समाज दुःखात सहभागी व्हायचा. कुठल्याही जाती-धर्माचा विचार न करता सगळे एकत्र यायचे. शेवटचा नि...

आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप – एक चिंतन

*लेख: आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप – एक चिंतन,  सुनील पुणे TM 8007939422* आजचा काळ हा डिजिटल आणि मोबाईलच्या वेगवान युगाचा आहे. या काळात माणसांचे विचार, गरजा आणि आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. याचा थेट परिणाम आपल्यासारख्या पारंपरिक भारतीय समाजातील "लग्नसंस्था" या मूलभूत घटकावर होत आहे. पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा, दोन विचारधारांचा, दोन जीवनशैलींचा एकत्र येणं असायचं. संस्कार, संयम, सहवास, समर्पण आणि सहकार्य या आधारावर संसार उभा राहत असे. पण आज, ही परंपरा एका वेगळ्याच वळणावर उभी आहे. आजची तरुण पिढी  मुलं आणि मुली  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. शिक्षण, नोकरी, करिअरच्या संधीमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळालंय. यामुळे लग्नाच्या बाबतीतही त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. कुणी प्रेमविवाह करतंय, कुणी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतंय, तर कुणी लग्नच नको असं स्पष्टपणे सांगतंय. या बदललेल्या जीवनशैलीत ‘एकत्रित कुटुंबपद्धत’ ही संकल्पना हरवत चालली आहे. या पद्धतीत पती-पत्नीला मार्गदर्शन, आधार आणि जबाबदारी यांचा भक्कम पाठिंबा मिळत असे. आज ती साथ आणि...

विधवा वा विधुराशी पुनर्विवाह एक संवेदनशील व वास्तववादी विचार

*विधवा वा विधुराशी पुनर्विवाह  एक संवेदनशील व वास्तववादी विचार* सुनिल पुणेTM 8007939422 आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत विवाहसंस्थेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये सामंजस्य, सहनशीलता आणि समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो. भारतीय व ब्रिटिश कायदे विशेषतः महिलांच्या बाजूने झुकलेले असल्याने, अनेकदा विवाहामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा शेवट फारकतीत होतो. मेंटेनन्स, कौटुंबिक वाद, आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होतात. परंतु, आयुष्यात एखादा विवाह मोडला आणि नव्याने आयुष्य सुरु करायचेच असेल, तर एक विचार करायला हवा  अशा वेळी आपण आपल्या सारख्याच वेदना अनुभवलेल्या एखाद्या विधवा किंवा विधुराशी गाठ बांधणे हे अधिक समंजस आणि संवेदनशील पाऊल ठरू शकते. विधवा वा विधुर व्यक्तींना आयुष्याचा खरा अर्थ, सहचराची किंमत, आणि नात्याचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजलेले असते. त्यांच्या वेदनेतून त्यांनी सहनशीलता, प्रेम आणि आपुलकीचा अर्थ आत्मसात केलेला असतो. अशा जोडप्यांमध्ये परस्पर सन्मान, मूक समजूत आणि परिपक्वता असते. हे नातं केवळ दोन व्यक्तींचं नसतं, तर दोन आयुष...

जीवनाचे सत्य आणि समजूतदारपणाचे जगणे

*“जीवनाचे सत्य आणि समजूतदारपणाचे जगणे”* ( लेखक  सुनिल पुणे TM 8007939422 )  18 जुन 2023 जीवन म्हणजे एक उघड पुस्तक आहे, पण त्यातील अक्षरांचे अर्थ अनेकांना अजूनही उमगलेले नाहीत. आपण रोजच्या धावपळीत ‘जगणे’ तर जगत आहोत, पण खरेच जीवनाचा अर्थ समजून घेतो आहोत का? हाच एक मूलभूत प्रश्न आजच्या काळात प्रत्येक सजग व्यक्तीसमोर उभा ठाकतो. आजचं युग हे विज्ञान, माहिती आणि डिजिटल वेगाने बदलणारं आहे. लोक जगत आहेत, कमावत आहेत, प्रसिद्ध होत आहेत… पण तरीही अनेकांच्या चेहऱ्यावर असंतोष, गोंधळ, आणि अपूर्णतेचं भाव स्पष्ट दिसतो. याचं कारण म्हणजे "सत्याचा बोध न होणे." जीवन हे फक्त काळ सरणं नाही, तर प्रत्येक क्षणात काहीतरी शिकत, समजत आणि स्वतःला घडवत जगणं हेच खरं जीवन आहे. जर जीवन फक्त उपभोग घेण्यासाठी असतं, तर इतिहासात संत, विचारवंत, तत्वज्ञ यांची गरज भासली नसती. त्यांनी समाजाला "सत्य" दाखवलं  जे केवळ डोळ्यांनी नव्हे तर अंतःकरणाने पाहिलं जातं. जीवनाच्या अर्थाचा शोध हा केवळ शारीरिक सुखसंपत्ती मिळवण्यात नाही, तर आत्मिक समाधानात आहे. आज समाजात ताण, द्वेष, स्पर्धा, अहंकार यांच्या सावल्या गडद होत ...

क्षणांचं सोनं करा....!

*"क्षणांचं सोनं करा..." लेखक : सुनिल पुणे TM 8007939422* "जो नसीब मे है वो चलकर आयेगा, जो नही है वो आकर भी चला जायेगा..." हे वाक्य ऐकताना मनात खोलवर जाणवतं  आयुष्यात आपण धावत असतो, झगडत असतो, पण काही गोष्टी आपल्या नियतीतच नसतात. मग त्या कितीही हात जोडून मागितल्या तरीही मिळत नाहीत. आणि ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात, त्या कुठूनही, कशाही येतात आणि आयुष्याला एक नवा अर्थ देऊन जातात. म्हणूनच, इतकं सीरियस घेऊन काय उपयोग? आपण सर्व जण या पृथ्वीवर एका ठराविक वेळेसाठी आलो आहोत. कुणी थोडं आधी निघतो, कुणी थोडं उशिरा... पण शेवटी जायचं सगळ्यांनाच आहे. इथे कोणीच "जिंदा बचकर" जात नाही. मग का उगाच चिंता करत बसायचं? का उगाच दुःखाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं? का आयुष्य घालवायचं "कळतंय पण वळत नाही" या अवस्थेत? हो, एक कटू सत्य हेही आहे की, जर जीवन इतकं सुंदर असतं, तर आपण या जगात जन्माला येताना हसत आलो असतो ना! पण आपण आलो रडत रडत  कारण ही दुनिया आपल्यासाठी नवीन होती, वेगळी होती, आणि कदाचित कठीणसुद्धा! पण त्याचबरोबर एक गोड सत्य देखील आहे  जर ही जिंदगी एवढी वाईट अस...

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

*"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"* लेखक: सुनिल पुणे TM 8007939422 माणूस जन्मतःच भावनांनी भरलेला असतो. प्रेम, आपुलकी, माया, आणि जवळीक हे त्याच्या स्वभावाचे अविभाज्य घटक असतात. आपण कोणालातरी जीव लावतो, आपलं म्हणतो, त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. पण अनेकदा याच ‘जीव लावण्याच्या’ भावना आपल्यालाच त्रासदायक ठरतात, जेव्हा समोरचा त्या भावनांची कदर करत नाही. कुठल्याही नात्यांमध्ये समतोल हवा. आपण जर अती जीव लावायला लागलो, तर अनेकदा समोरच्याच्या मनात आपल्याविषयीचा आदर कमी होतो. जेव्हा आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत राहतो, स्वतःच्या गरजा विसरतो, त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जातो – तेव्हा हळूहळू आपल्याला ‘समजून घेणं’ थांबतं आणि 'गृहित धरलं जातं’. अति जीव लावल्यावर जेव्हा समोरचा माणूस आपल्याला पायपुसणं समजतो, तेव्हा दुःख होतं. कारण आपण मनापासून दिलं असतं – वेळ, भावना, आधार – आणि त्या बदल्यात मिळतो उपेक्षेचा शेला. म्हणूनच, नाती असोत की मैत्री – प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा हवीच. जीव लावा, प्रेम करा, साथ द्या – पण स्वतःला हरवून नाही. स्वतःचा स्वाभिमान, आपली किंमत ही जपली गेली पाहिज...

आठवणी, नाती आणि मनाच्या गाठी

*आठवणी, नाती आणि मनाच्या गाठी* लेखक सुनिल पुणे TM 8007939422 काही आठवणी या काळाच्या ओघात विसरता येत नाहीत. त्या क्षणांशिवाय जगणं अपूर्ण वाटतं. मनाच्या खोल कप्यात त्या आठवणी लपून बसलेल्या असतात, क्षणोक्षणी त्या डोकावतात. कधी एखाद्या गाण्यातून, कधी एखाद्या वासातून, तर कधी अचानक आलेल्या एखाद्या चेहर्‍यातून त्या पुन्हा जाग्या होतात. काही नाती अशी असतात की ती तोडण्याचा प्रयत्नही व्यर्थ ठरतो. जरी नात्यांमध्ये अंतर आले, संवाद थांबले, तरी त्या गाठी मनाशी घट्ट बांधलेल्या असतात. माणसं दूर जातात, पण त्या नात्यांचा स्पर्श मनाला नेहमी लागलेला असतो. चेहरे बदलतात, पण खरी ओळख बदलत नाही. व्यक्तीमत्वाची गोडी, त्यांचं वागणं, बोलणं  हे सगळं हृदयात कोरलेलं असतं. नवीन भेटी, नवीन नाती येतात, पण काही जुन्या ओळखी मनात कायम घर करून राहतात. वाटाही अनेकदा बदलतात. जीवनाची दिशा वेगळी होते, माणसं वेगवेगळ्या मार्गाने निघून जातात. पण ज्या वाटांवरून एकत्र चाललो, त्यांची ओढ कधी संपत नाही. त्या वाटा जणू मनाच्या नकाशावर कायम राहतात. आणि हो, पाऊल अडखळतंही... जीवनात संकटं येतात, थांबावं असं वाटतं. पण मनाचं बळ असं काही अ...

बाप आपल्या सोबत असला की… आपण जगाचा बाप असल्यासारखं वाटतं…

बाप आपल्या सोबत असला की… आपण जगाचा बाप असल्यासारखं वाटतं… सुनिल पुणेTM 9359850065 बाप म्हणजे छत्र… सावली… आधार… आणि एक अशी शांत शक्ती, जी कधी बोलत नाही पण सतत आपल्यामागे उभी असते. आईचं प्रेम जसं उघड असतं, तसं बापाचं प्रेम गुपचूप… पण खोल असतं. बाप कधी हसत नाही, लाड करत नाही, पण त्याच्या प्रत्येक श्रमात, त्याच्या कपाळावरच्या घामाच्या प्रत्येक थेंबात आपल्यासाठीचं प्रेम असतं. आपण लहान असतो तेव्हा वाटतं की बाप खूप कठोर आहे. तो ओरडतो, नियम लावतो, खर्च सांभाळतो, इच्छा मागे ठेवतो. पण मोठं झाल्यावर समजतं – ही कठोरता म्हणजेच आपल्यासाठीची शिस्त होती, भविष्याची काळजी होती. बाप सोबत असतो तेव्हा पाठीवर हात असतो. मनात एक हिम्मत असते – “काही झालं तरी बाबा आहे ना…” पण… एक दिवस बाप जातो… आणि मग समजतं की आपण खरंच पोरके झालो. घरात सगळं आहे, पण काहीतरी नाही. रोज सकाळी चहाच्या टेबलावर तो दिसत नाही. दारात उभं राहून वाट बघणारी नजर उरलेली नाही. हातात घड्याळ न बघता "उशीर झाला का?" विचारणारा तो आवाज नाही. पैशाने काही कमी नसतं, पण आत्मविश्वास कमी पडतो. कारण जो बाप आपल्याला बिनधास्त बनवतो, जो संकटांसमोर ...

आई – ऑफलाइन प्रेमाची ऑनलाईन जगातली अद्वितीय सावली

*"आई – ऑफलाइन प्रेमाची ऑनलाईन जगातली अद्वितीय सावली"* *लेखक – सुनिल पुणे TM 8007939422,* 11 May 2025. आज मातृदिन... जग कितीही बदलू दे, तंत्रज्ञानाने आकाश गाठले तरीही काही गोष्टी मात्र कायमच असतात. इंटरनेटचा वेग, मोबाईलचे बदलणारे पोर्ट  C पोर्ट, B पोर्ट, USB, कळवा, लहान पिन  सगळं काही झपाट्याने बदलतंय. प्रत्येक हातात मोबाईल, प्रत्येक मनात सोशल मिडीयाची झिंग. माणसाने मंगळावर पाय ठेवला, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण एक गोष्ट आजपर्यंत कुठल्याही टेक्नॉलॉजीने तयार करू शकलेली नाही  ती म्हणजे "आई". आई ही आजही आणि उद्याही कधीच ऑनलाईन होणार नाही, कधीच डिजिटल होणार नाही, कधीच सोशल मिडीयावर मिळणार नाही. कारण तिचं प्रेम हे वायफायचं नव्हे, तर जीवाच्या नात्याचं आहे. ती फोटो पोस्ट करत नाही, पण आयुष्यभर आपली आठवण मनात जपते. ती स्टेटस अपडेट करत नाही, पण आपल्या प्रत्येक यशाने तिचं मन भरून येतं. ती लाईक करत नाही, पण आपल्या प्रत्येक सुखासाठी दिवसरात्र झुरते. ती व्हॉइस मेसेज पाठवत नाही, पण तिच्या आवाजात जे आपुलकीचं संगीत आहे, ते कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या पलीकडचं आहे. आई ही फक्त जगा...

संपर्कातून समाधीकडे , टच मध्ये रहा

*संपर्कातून समाधीकडे , टच मध्ये रहा*  सुनिल पुणेTM 8007939422 आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हातात असलेला टच मोबाईल फोन हे आमूलाग्र साधन बनले आहे. आपण क्षणातच माहितीचा महासागर पार करू शकतो, मित्रांचे संदेश वाचू शकतो, आणि विश्वातल्या प्रत्येक कोपऱ्यातील घडामोडींवर नजर ठेवू शकतो. मात्र या स्क्रीनवर रमून, फक्त उपकरणाच्या स्पर्शात अडकून राहणे अपरिहार्य नाही, तर मनुष्याच्या अस्तित्वाचा मेरुदंड असलेली इतरांशी खरी जुळवून घेणे फारच महत्त्वाचे आहे. खऱ्या अर्थाने ‘टच’ होणे म्हणजे शब्दाच्या आणि भावनेच्या स्पर्शात जगणे. आपल्या हृदयातल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत, हसण्याची गूंज ऐकू आल्या पाहिजे, आणि इतरांच्या दु:खात आपण अगदी जवळून सामील होऊ शकले पाहिजे. फोनमधील संवाद हा तब्बल संवादाचा एकच मार्ग नाही; प्रत्यक्ष भेटी, डोळ्यांत डोळे मिळवून बोलणे, आणि उत्साहवर्धक मिठी यांचे स्थान काहीही भरू शकत नाही. जीवनाचा सच्चा आनंद तर त्या आराध्य क्षणांत दडलेला असतो, जेव्हा आपले शब्द आणि स्पर्श माणसाच्या हृदयात थेट घर करून जातात. त्या डिजिटल दुनियेत आपण कितीही पोहोचलो, तरी आपले नाते हे जपायला हवे. एक साधा ...

*प्रत्येक नातं प्रेमाचंच असावं असं नाही...!*

*प्रत्येक नातं प्रेमाचंच असावं असं नाही...!* लेखक – सुनिल पुणे TM 9359850065 आपण अनेकदा ऐकतो – "ती तुझी गर्लफ्रेंड आहे का?" किंवा "तुमचं दोघांचं काहीतरी सुरू आहे का?" म्हणजेच, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र दिसतात, बोलतात, हसतात, वेळ घालवतात, तेव्हा समाज लगेच त्यांच्या नात्याला "प्रेमाचं" नाव देतो. पण खरंच प्रत्येक नातं प्रेमाचंच असतं का? खरं सांगायचं तर मैत्रीचं नातं प्रेमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतं. मैत्रीत अपेक्षा नसते, हिशेब नसतो. ना मनावर हक्काचा भार, ना सतत अपडेट देण्याची जबाबदारी. मित्र किंवा मैत्रीण म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत चालणारा एक विश्वासू साथी. कोणी विचारलं, "तुझी ती कोण?" मी शांतपणे म्हणतो, "ती माझी सखी आहे, मैत्रीण आहे… एवढंच!" कारण मला माहित आहे, या नात्यात गडद भावना आहेत, पण त्या प्रेमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत. मैत्री म्हणजे समजूतदारपणाचं गाठोडं… ती निःस्वार्थ असते, आणि त्यामुळेच खरी असते. प्रेमात जेव्हा तडजोडी कराव्या लागतात, तेव्हा मैत्रीत समजुतीने एकमेकांना स्वीकारलं जातं. प्रेमात "का उशीर ...

"मधमाशी की फुलपाखरू? – एक विचार"

*"मधमाशी की फुलपाखरू? – एक विचार"* – Sunil Pune TM 8007939422 जीवनातील नात्यांचं गणित फार गहन असतं. विशेषतः लग्नानंतरचं. अनेकदा पत्नीला आपण मधमाशीशी तुलना करतो – ती कधी कधी चावते, बोचते, त्रास देते. पण तीच आपल्या घराला गोडसर मधानं भरते. तिचं प्रेम, काळजी, तिचा राग, तणाव – हे सगळं तिच्या जबाबदारीतून येतं. दुसरीकडे, बाहेरचं फुलपाखरू... आकर्षक, रंगीत, स्वच्छंदी! त्याचं सौंदर्य क्षणिक मोह घालणारं असतं. ते आपल्याला काही क्षणांचं समाधान देतं, मनाला भुरळ घालते. पण ते कुठेच स्थिर राहत नाही. एकदा गेलं की परत कधीच सापडत नाही. म्हणूनच, आयुष्याच्या प्रवासात फुलपाखराच्या मोहापेक्षा मधमाशीचं अस्तित्व अधिक मोलाचं आहे. कारण ती आपलं घर सावरते, आपल्या संसाराची गोडी टिकवते. अशा या मधमाशीच्या किंमतीला ओळखा, तिच्या चावण्यातही प्रेम आहे, तिच्या रागातही काळजी आहे. आणि हो, फुलपाखराच्या रंगांनी भुलू नका – ते क्षणिक असतं, पण मधमाशीचं साथ कायमची! सुनिल पुणे TM 9359850065, link=  sunilpunetm.blogspot.com

ती... स्त्रीत्वाची आरती!" लेखक – सुनिल पुणे TM 8007939422, 8 मे 2025

*"ती... स्त्रीत्वाची आरती!" लेखक – सुनिल पुणे TM 8007939422, 8 मे 2025 ती केवळ एक नातं नाही... ती एक अनुभव आहे. ती आई आहे, जिला आपल्यासाठी स्वप्नं पण गहाण टाकायची तयारी असते. ती मावशी आहे, जिला रक्ताचं नातं लागत नाही, पण मायेचं नातं जन्मभर पुरतं. ती काकू आहे, जिला आपण ‘मामकीण’ म्हणतो, पण ती स्वतःचं सर्व सांभाळून आपल्यावरही जीव लावते. ती बहीण आहे, जी आपल्या यशात टाळ्या वाजवते आणि अपयशात आपले अश्रू पुसते. ती प्रियसी आहे, जिने आपल्या मनात प्रेमाचं प्रथम बीज रोवलं. ती पत्नी आहे, जिला आपण "आर्धांगिनी" म्हणतो, पण ती कधीच अर्धी राहत नाही, ती पूर्ण साथ देते. ती साली आहे, जिला आपण चेष्टेने घेतो, पण ती बहिणीच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून सतत जागरूक असते. ती महिला अधिकारी आहे, जिला जबाबदारीची पदवी मिळवूनही नम्रतेची साडी गुंडाळलेली असते. ती महिला शिपाई आहे, जिला स्वतःच्या कुटुंबाची चिंता असूनही तुमचं रक्षण करणं हे कर्तव्य वाटतं. ती प्रत्येक स्वरूपात जगाला समजून घेत राहते. ती जग जिंकते – पण बांगड्या वाजवत. ती लढते – पण डोळ्यांत पाणी ठेवत. ती उभी राहते – पण कुणालाही खाली न करता...

गुलाबजाम आणि शुगर – एक सकारात्मक विचार

*गुलाबजाम आणि शुगर – एक सकारात्मक विचार* लेखक – सुनिल पुणे TM 9359850065 आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी टीका, मत्सर, किंवा तिरस्काराचा सामना करावा लागतो. काही लोक आपल्याला न आवडणं हे त्यांच्या वृत्तीचं प्रतिबिंब असतं, आपल्या किंमतीचं नव्हे. अशा वेळी आपण आपलं मन शांत ठेवून, स्वतःवरचा विश्वास न ढळू देता, पुढे जाणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणूनच मी एक विचार करत जगतो – “आपण गुलाबजाम आहोत आणि आपला तिरस्कार करणाऱ्याला शुगर आहे.” काय सुंदर विचार आहे ना! गुलाबजाम हा गोड, मऊ आणि मनाला सुखावणारा असतो. पण शुगर असलेल्या माणसाला तो खाल्ला तरी त्रास होतो. त्याने गुलाबजामचा तिरस्कार केला, तरी त्याचं दोष आपल्यात नाही, तर त्याच्या शरीराच्या मर्यादेत आहे. हा विचार आपल्याला शिकवतो की, आपण आपली गोडी, आपली किंमत, आपलं प्रेमळपण टिकवून ठेवलं पाहिजे. कोणी आपल्याला नाकारलं, दूर ठेवलं, तर ते त्यांच्या क्षमतेचा किंवा समजुतीचा प्रश्न आहे – आपल्या गुणांचा नाही. जीवनात कायम सकारात्मक रहा. गुलाबजामसारखी आपली आत्मगुणांची गोडी अशीच राहू द्या – ती ज्या मनाला पचेल, त्या मनातच घर करेल. सुनिल पुणे TM 9359850065. tops...

लहानपणचं खरं आयुष्य

*लहानपणचं खरं आयुष्य*, सुनिल पुणेTM 8007939422 मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येईल, असं बालपणी वाटायचं… आपण मोठे झालो की आई-वडिलांच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतःच्या मर्जीनं सगळं करू, आपलं जग स्वतः घडवू… असं स्वप्न वाटायचं. पण खरं सांगायचं झालं, तर मोठं होणं म्हणजे मनासारखं जगणं नाही, तर जबाबदाऱ्यांचं ओझं पेलणं असतं, हे आता उमगायला लागलंय. लहानपण म्हणजे काळजीमुक्त आयुष्य. घरात आईच्या पदराची सावली, वडिलांच्या हाताचा आधार, आणि मनात एक निरागस बालपण. शाळा, खेळ, भांडणं, रडणं, हसणं – सगळं मनासारखं. तेव्हा आपण वेळेचे कैदी नव्हतो. जेवढं जगायचं तेवढं आनंदात जगायचं. पण मोठं झाल्यावर? मोठं झालं की एकाकीपणा सुरू होतो. जबाबदाऱ्या – घराच्या, कुटुंबाच्या, नात्यांच्या, कामाच्या – सतत पाठीमागे लागतात. हसण्यामागे चिंता असते, आणि शांततेमागे थकवा. बालपणी वाटायचं, "मोठं झाल्यावर मोबाईल आपलाच, पैसा आपलाच, वेळ आपलाच!" पण आता कळतं की या सगळ्यावर कुणाचं तरी नियंत्रण असतं – कधी ऑफिसचं, कधी समाजाचं, तर कधी परिस्थितीचं. आणि म्हणूनच वाटतं – खरं आयुष्य आपण तेव्हाच जगलो होतो, जेव्हा कोणतीही योजना नव्ह...

"स्त्री – एक शक्तिरूप, एक सन्मान"

*"स्त्री – एक शक्तिरूप, एक सन्मान"* लेखक : सुनील पुणे TM 8007939422. स्त्री म्हणजे केवळ एक जीव नाही, ती संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे. समाजाने कितीही पुरुषप्रधानतेचा बुरखा पांघरला असला, तरी स्त्रीची खरी ओळख ही तिच्या सामर्थ्यानेच होते. ती केवळ ताई, पत्नी, आई, सासू, आजी या नात्यांपुरती मर्यादित नाही; ती एक विचार आहे, एक संस्कृती आहे, आणि एक प्रेरणास्रोत आहे. जन्मल्याक्षणापासून ती जबाबदाऱ्या स्वीकारते. घराला घरपण ती देते, आणि माणसाला माणूसपण ती शिकवते. तिच्या मिठीतच जीवनाचं खरे सुख लपलेलं असतं. पुरुष हा केवळ शरीराने बळकट असतो, पण स्त्री ही मनाने, भावनांनी, सहनशीलतेने, आणि विचारांनी कितीतरी पटीने बलवान असते. *इतिहास साक्षी आहे — राणी लक्ष्मीबाईने तलवार हातात घेत स्वराज्यासाठी शत्रूंशी सामना केला. दुसरीकडे, समाजाच्या अन्यायाविरुद्ध फुलनदेवींनी बंड पुकारले. एका बाजूला सावित्रीबाई फुले सारख्या स्त्रीने शिक्षणाचा दीप लावला, तर दुसरीकडे कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांसारख्या स्त्रिया अंतराळातही झेपावल्या. हे काही उदाहरणं पुरेसे आहेत स्त्रीच्या सामर्थ्याची गाथा सांगायला.* ती रडते, प...

स्त्रीच्या हृदयात पोहोचण्याचा खरा मार्ग..

*स्त्रीच्या हृदयात पोहोचण्याचा खरा मार्ग... लेखक – सुनील पुणे TM 9359850065* "पुरुषाच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो," ही जुनी म्हण आपण नेहमी ऐकत आलो आहोत. प्रेमाने बनवलेला गरमागरम बेत, जेवणात मनापासून केलेला पदार्थ, हे खरंच पुरुषाला आनंद देतं, आपुलकी वाटू लागते. पण प्रश्न असा आहे की, स्त्रीच्या हृदयात पोहोचायचं असेल तर तो मार्ग कोणता? स्त्री ही मनाने फारच नाजूक, परंतु आत्म्याने अत्यंत मजबूत असते. तिच्या हृदयात पोहोचण्यासाठी कुठलं जेवण किंवा बाह्य आकर्षण उपयोगाचं ठरत नाही. तिच्या हृदयात पोहोचायचा खरा मार्ग आहे  "समजून घेणं, प्रेमळ संवाद आणि तिच्या भावनांना मान देणं." ती ऐकली गेली पाहिजे, समजून घेतली गेली पाहिजे आणि तिच्या छोट्याशा प्रयत्नांचीही मनापासून दखल घेतली गेली पाहिजे. घरासाठी, कुटुंबासाठी, नात्यांसाठी ती जे काही करते  त्याची मनापासून कदर केली की, तिचं हृदय खुलतं, विश्वास जुळतो आणि प्रेमाची जुळवाजुळव खर्‍या अर्थानं सुरू होते. स्त्रीच्या हृदयात जाण्याचा मार्ग म्हणजे तिच्या "भावनांचे आणि विचारांचे मनापासून कौतुक करणं". तिला जिंकण्यासाठ...