आई – ऑफलाइन प्रेमाची ऑनलाईन जगातली अद्वितीय सावली
*"आई – ऑफलाइन प्रेमाची ऑनलाईन जगातली अद्वितीय सावली"*
*लेखक – सुनिल पुणे TM 8007939422,*
11 May 2025.
आज मातृदिन...
जग कितीही बदलू दे, तंत्रज्ञानाने आकाश गाठले तरीही काही गोष्टी मात्र कायमच असतात. इंटरनेटचा वेग, मोबाईलचे बदलणारे पोर्ट C पोर्ट, B पोर्ट, USB, कळवा, लहान पिन सगळं काही झपाट्याने बदलतंय. प्रत्येक हातात मोबाईल, प्रत्येक मनात सोशल मिडीयाची झिंग.
माणसाने मंगळावर पाय ठेवला, कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली, पण एक गोष्ट आजपर्यंत कुठल्याही टेक्नॉलॉजीने तयार करू शकलेली नाही ती म्हणजे "आई".
आई ही आजही आणि उद्याही कधीच ऑनलाईन होणार नाही, कधीच डिजिटल होणार नाही, कधीच सोशल मिडीयावर मिळणार नाही.
कारण तिचं प्रेम हे वायफायचं नव्हे, तर जीवाच्या नात्याचं आहे.
ती फोटो पोस्ट करत नाही, पण आयुष्यभर आपली आठवण मनात जपते.
ती स्टेटस अपडेट करत नाही, पण आपल्या प्रत्येक यशाने तिचं मन भरून येतं.
ती लाईक करत नाही, पण आपल्या प्रत्येक सुखासाठी दिवसरात्र झुरते.
ती व्हॉइस मेसेज पाठवत नाही, पण तिच्या आवाजात जे आपुलकीचं संगीत आहे, ते कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या पलीकडचं आहे.
आई ही फक्त जगाला जन्म देणारी नाही, तर आपल्याला माणूस बनवणारी आहे.
ती शिकवते, समजावते, रडते, हसवते, पण कधीच थांबत नाही.
म्हणूनच आज या मातृदिनाच्या निमित्ताने, सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवावी
जगातल्या सगळ्या सिग्नल्स हरवले, तरी आईचं प्रेम कधीच ‘डिस्कनेक्ट’ होत नाही.
आई ही प्रत्येक काळात "परफेक्ट अपडेटेड व्हर्जन" आहे प्रेमाचं, समर्पणाचं, आणि त्यागाचं!
ती कधीच ट्रेंडमध्ये नसते, पण तिचं प्रेम टाइमलेस असतं.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुनिल पुणे TM 9359850065. sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment