ती... स्त्रीत्वाची आरती!" लेखक – सुनिल पुणे TM 8007939422, 8 मे 2025
*"ती... स्त्रीत्वाची आरती!" लेखक – सुनिल पुणे TM 8007939422, 8 मे 2025
ती केवळ एक नातं नाही... ती एक अनुभव आहे.
ती आई आहे, जिला आपल्यासाठी स्वप्नं पण गहाण टाकायची तयारी असते.
ती मावशी आहे, जिला रक्ताचं नातं लागत नाही, पण मायेचं नातं जन्मभर पुरतं.
ती काकू आहे, जिला आपण ‘मामकीण’ म्हणतो, पण ती स्वतःचं सर्व सांभाळून आपल्यावरही जीव लावते.
ती बहीण आहे, जी आपल्या यशात टाळ्या वाजवते आणि अपयशात आपले अश्रू पुसते.
ती प्रियसी आहे, जिने आपल्या मनात प्रेमाचं प्रथम बीज रोवलं.
ती पत्नी आहे, जिला आपण "आर्धांगिनी" म्हणतो, पण ती कधीच अर्धी राहत नाही, ती पूर्ण साथ देते.
ती साली आहे, जिला आपण चेष्टेने घेतो, पण ती बहिणीच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून सतत जागरूक असते.
ती महिला अधिकारी आहे, जिला जबाबदारीची पदवी मिळवूनही नम्रतेची साडी गुंडाळलेली असते.
ती महिला शिपाई आहे, जिला स्वतःच्या कुटुंबाची चिंता असूनही तुमचं रक्षण करणं हे कर्तव्य वाटतं.
ती प्रत्येक स्वरूपात जगाला समजून घेत राहते.
ती जग जिंकते – पण बांगड्या वाजवत.
ती लढते – पण डोळ्यांत पाणी ठेवत.
ती उभी राहते – पण कुणालाही खाली न करता.
ती यश मिळवते – पण बिनधास्त कुणालाही हात देऊन पुढे नेते.
ती कुणाच्या घरी जन्म घेते – पण घराला घरपण तीच देते.
ती आपल्या स्वप्नांना बाशिंग बांधून इतरांचे स्वप्न पूर्ण करते.
ती कधी "कमकुवत" नाही – ती "संवेदनशील" असते.
कधी ही रडते, पण हे अश्रू हे तिचं शस्त्र नसून, तिची सच्चाई असते.
*आज मी, सुनिल पुणे TM, सर्व जगातील महिलांना साष्टांग नमस्कार करतो. माझ्या लेखाचे एकच वाक्य त्यांच्या हृदयात घर करावं, इतकं प्रेमाने आणि आदराने मी लिहितो*
"तुमच्यामुळेच हे जग सुंदर आहे. आणि म्हणूनच, प्रत्येक स्त्री हे विश्वाचं सर्वात अद्वितीय चमत्कार आहे!"
*हा लेख मी लिहीत नाही, मी हा लेख तुमच्यासाठी ओंजळ भरून "सन्मान" म्हणून अर्पण करतो!*
सुनिल पुणे TM 9359850065. 8007939422
topsunil@gmail.com
*तुमचं प्रेम, अभिप्राय आणि आशीर्वाद हवे आहेत मला...*
Comments
Post a Comment