*प्रत्येक नातं प्रेमाचंच असावं असं नाही...!*
*प्रत्येक नातं प्रेमाचंच असावं असं नाही...!*
लेखक – सुनिल पुणे TM 9359850065
आपण अनेकदा ऐकतो – "ती तुझी गर्लफ्रेंड आहे का?" किंवा "तुमचं दोघांचं काहीतरी सुरू आहे का?"
म्हणजेच, जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र दिसतात, बोलतात, हसतात, वेळ घालवतात, तेव्हा समाज लगेच त्यांच्या नात्याला "प्रेमाचं" नाव देतो. पण खरंच प्रत्येक नातं प्रेमाचंच असतं का?
खरं सांगायचं तर मैत्रीचं नातं प्रेमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतं.
मैत्रीत अपेक्षा नसते, हिशेब नसतो. ना मनावर हक्काचा भार, ना सतत अपडेट देण्याची जबाबदारी.
मित्र किंवा मैत्रीण म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत चालणारा एक विश्वासू साथी.
कोणी विचारलं, "तुझी ती कोण?"
मी शांतपणे म्हणतो, "ती माझी सखी आहे, मैत्रीण आहे… एवढंच!"
कारण मला माहित आहे, या नात्यात गडद भावना आहेत, पण त्या प्रेमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत.
मैत्री म्हणजे समजूतदारपणाचं गाठोडं…
ती निःस्वार्थ असते, आणि त्यामुळेच खरी असते.
प्रेमात जेव्हा तडजोडी कराव्या लागतात, तेव्हा मैत्रीत समजुतीने एकमेकांना स्वीकारलं जातं.
प्रेमात "का उशीर झाला?" हे विचारलं जातं,
पण मैत्रीत "बरंय, तू सुरक्षित आहेस ना?" असं विचारलं जातं.
कधी कधी अशी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, जी फक्त मित्र म्हणून असते –
पण तिचं महत्व किती आहे हे शब्दांत मांडणं अशक्य असतं.
ती आपल्यावर हसते, आपल्याला रडताना पाहते, आपल्याला समजून घेते –
पण तिच्याशी कोणतंही प्रेमाचं नाव देण्याची गरज भासत नाही.
म्हणूनच सांगतो – प्रत्येक नातं 'प्रेमी-प्रेमिकेचं' असावं असं नाही,
कधी कधी 'मित्र-मैत्रीणीचं' नातं आयुष्याला अधिक सुंदर रंग देऊन जातं.
सुनिल पुणे TM 8007939422. लिंक - sunilpunetm.blogspot.com
(हे मनापासून लिहिलेलं, नात्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी , मैत्री दिनाच्या शुभेच्छा 🍫)
Comments
Post a Comment