स्त्रीच्या हृदयात पोहोचण्याचा खरा मार्ग..

*स्त्रीच्या हृदयात पोहोचण्याचा खरा मार्ग... लेखक – सुनील पुणे TM 9359850065*

"पुरुषाच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो," ही जुनी म्हण आपण नेहमी ऐकत आलो आहोत. प्रेमाने बनवलेला गरमागरम बेत, जेवणात मनापासून केलेला पदार्थ, हे खरंच पुरुषाला आनंद देतं, आपुलकी वाटू लागते. पण प्रश्न असा आहे की, स्त्रीच्या हृदयात पोहोचायचं असेल तर तो मार्ग कोणता?

स्त्री ही मनाने फारच नाजूक, परंतु आत्म्याने अत्यंत मजबूत असते. तिच्या हृदयात पोहोचण्यासाठी कुठलं जेवण किंवा बाह्य आकर्षण उपयोगाचं ठरत नाही. तिच्या हृदयात पोहोचायचा खरा मार्ग आहे  "समजून घेणं, प्रेमळ संवाद आणि तिच्या भावनांना मान देणं."

ती ऐकली गेली पाहिजे, समजून घेतली गेली पाहिजे आणि तिच्या छोट्याशा प्रयत्नांचीही मनापासून दखल घेतली गेली पाहिजे. घरासाठी, कुटुंबासाठी, नात्यांसाठी ती जे काही करते  त्याची मनापासून कदर केली की, तिचं हृदय खुलतं, विश्वास जुळतो आणि प्रेमाची जुळवाजुळव खर्‍या अर्थानं सुरू होते.

स्त्रीच्या हृदयात जाण्याचा मार्ग म्हणजे तिच्या "भावनांचे आणि विचारांचे मनापासून कौतुक करणं". तिला जिंकण्यासाठी तिच्या मनाचा आणि आत्म्याचा सन्मान करणं गरजेचं असतं. सुंदर शब्द, वेळेवरचा आधार, आणि न बोलता समजून घेणं  हेच तिचं खरं 'पाककृतीचं पुस्तक' आहे.

म्हणूनच, पुरुषाला पोटातून आणि स्त्रीला मनातून जिंका... मग पहा, आयुष्य किती सुंदर होतंय!

सुनिल पुणेTM,
topsunil@gmail.com 8007939422, 9359850065.

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?