आजच्या स्त्रीच्या मनाचा कोंडमारा, आधुनिकतेच्या सावलीत हरवलेलं अस्तित्व

*"आजच्या स्त्रीच्या मनाचा कोंडमारा,  आधुनिकतेच्या सावलीत हरवलेलं अस्तित्व" लेखक – सुनील पुणे TM 8007939423*

आजचा काळ डिजिटल आहे, आधुनिक आहे, प्रगत आहे... पण आजच्या स्त्रीच्या मनात एक प्रश्न सतत घोंगावत असतो,  "माझं खरं स्थान समाजात कुठे आहे?"

ती लहानपणी वडिलांच्या छायेत वाढते, तारुण्यात पतीच्या आधारावर संसार चालवते, नंतर भाऊ, मुलगा, नातू यांच्या गरजांमध्ये स्वतःला विसरून जाते. पण कधी तिला विचारलं जातं का,  "तुला काय हवंय? तू खुश आहेस का?"

हाऊसवाईफ, एक दुर्लक्षित भूमिका
घर सांभाळणारी स्त्री म्हणजे घराची मूळ आधारस्तंभ. ती सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, वृद्ध, पाहुणे, स्वयंपाक, साफसफाई यांत गुंतलेली असते. पण तिच्या श्रमांना, तिच्या त्यागाला, तिच्या थकव्याला मान्यता मिळते का?
तिचं नाव नसेल पगारपत्रकात, पण तीच खरी "फुल टाइम कर्मचारी" आहे,  अविरत, न थकता.

नोकरी करणारी स्त्री,  दुहेरी जबाबदारीच ओझ

ती ऑफिसमध्ये काम करते, तिथे टार्गेट्स पूर्ण करते, वेळ पाळते, अधिकार पेलते. पण घरी परतल्यावर तिला “मुलांची आई”, “सुना”, “बायको” या भूमिकांत परत शिरावं लागतं. तिच्या थकव्याला कोणी समजून घेतं का? उलट अपेक्षा वाढतात,  "तुझं तर घराबाहेर पडणं होतं, आम्ही काय बसून राहिलो का?"
हा मनाचा कोंडमारा तिला दिवसागणिक गिळून टाकतो.

स्वतंत्र विचारांची स्पेस कुठे आहे?

स्त्रीला निर्णय घेण्याचा अधिकार हवाच, मग तो कपड्यांपासून करिअरपर्यंत, वैयक्तिक आयुष्यापासून ते सामाजिक सहभागापर्यंत. पण समाज अजूनही तिच्या स्वतंत्र मतांना संकोचाने, संशयाने, किंवा विरोधाने बघतो. ती नवर्याशिवाय बाहेर गेली तर चर्चा होते, ती उघडपणे बोलली तर "बोलघेवडी" ठरते.

एकटी स्त्री, समाजाचा आरसा

विधवा, घटस्फोटित, अविवाहित स्त्री समाजात अजूनही उपेक्षित का वाटते?
ती जर एकटी राहत असेल, स्वतःचा व्यवसाय करत असेल, स्वतःच्या निर्णयावर ठाम असेल, तर तिला समाज टाळतो, कधी हिणवतो.
ती कोणावर अवलंबून नसेल, तर समाज तिला स्वीकारत नाही,  ही शोकांतिका आहे.
तिचं मनही प्रेम, आपुलकी, सुरक्षिततेची गरज बाळगून असतं, पण समाज केवळ तिच्या स्थितीकडे बघतो,  मनाकडे नाही.

स्त्री म्हणजे फक्त कर्तव्याची मूर्ती नाही
ती हसते, रडते, थकते, लढते. तिला स्पेस हवी आहे,  एक अशी जागा जिथे ती स्वतःसाठी श्वास घेईल.
तीला हक्क आहे की तिने आपल्या मनाचं बोलावं, स्वतंत्र विचार करावा, आणि निर्णय घ्यावा.

शेवटी एकच गोष्ट महत्वाची आहे,  'तीसुद्धा माणूस आहे.'
तिला फक्त शरीर, सौंदर्य, सेवा, किंवा सहनशक्तीच्या चौकटीत न मापता, तिच्या भावनांनाही तितकंच महत्त्व द्या.
ती नाजूक असली तरी कमकुवत नाही. ती प्रेमळ असली तरी मूर्ख नाही. ती गप्प बसते, पण विसरते नाही.

आज जर आपण तिच्या मनाची वेदना समजून घेतली, तिला सन्मान दिला, आणि तिच्या अस्तित्वाला मान्यता दिली – तर खरंच आपण आधुनिक समाज बनतो.

लेखक –
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(प्रेरणादायक लेखक, ज्युरी मेंबर, अनुभवी छायाचित्रकार आणि महिला सन्मानाचा समर्थक)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?