"मधमाशी की फुलपाखरू? – एक विचार"

*"मधमाशी की फुलपाखरू? – एक विचार"*
– Sunil Pune TM 8007939422

जीवनातील नात्यांचं गणित फार गहन असतं. विशेषतः लग्नानंतरचं. अनेकदा पत्नीला आपण मधमाशीशी तुलना करतो – ती कधी कधी चावते, बोचते, त्रास देते. पण तीच आपल्या घराला गोडसर मधानं भरते. तिचं प्रेम, काळजी, तिचा राग, तणाव – हे सगळं तिच्या जबाबदारीतून येतं.

दुसरीकडे, बाहेरचं फुलपाखरू... आकर्षक, रंगीत, स्वच्छंदी! त्याचं सौंदर्य क्षणिक मोह घालणारं असतं. ते आपल्याला काही क्षणांचं समाधान देतं, मनाला भुरळ घालते. पण ते कुठेच स्थिर राहत नाही. एकदा गेलं की परत कधीच सापडत नाही.

म्हणूनच, आयुष्याच्या प्रवासात फुलपाखराच्या मोहापेक्षा मधमाशीचं अस्तित्व अधिक मोलाचं आहे. कारण ती आपलं घर सावरते, आपल्या संसाराची गोडी टिकवते.

अशा या मधमाशीच्या किंमतीला ओळखा, तिच्या चावण्यातही प्रेम आहे, तिच्या रागातही काळजी आहे.
आणि हो, फुलपाखराच्या रंगांनी भुलू नका – ते क्षणिक असतं, पण मधमाशीचं साथ कायमची!

सुनिल पुणे TM 9359850065, link= 
sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"