ती... तिचं मन... आणि एक न कळणारं विश्व

*"ती... तिचं मन... आणि एक न कळणारं विश्व"*
लेखक: सुनिल पुणेTM 8007939422.

*ती दिसते शांत... पण तिच्या मनात दररोज शंभर विचारांची गर्दी असते.*
ती हसते मनापासून... पण तिचं हसणं हे तिच्या मनाच्या हजारो भावना लपवून ठेवलेलं नकळत मुखवटं असतं.
ती झुंजते,  प्रेमासाठी, घरासाठी, अस्तित्वासाठी. पण तिची ही झुंज कुणाला कधी दिसत नाही.

ती बायको असते, आई असते, सून असते, बहिण असते, 
पण या सगळ्या नात्यांच्या पलीकडे ती एक "स्त्री" असते, एक "मन" असते,
जिचंही एक कोमल, प्रेमळ, आणि खूप स्वप्नाळू जग असतं...

तिच्या मनातही कुणाचं तरी प्रेम जपलेलं असतं,  कधी व्यक्त झालेलं, कधी मनातच ठेवलेलं.
तिला आजही आवडतो चहा हातात घेऊन गॅलरीत बसणं,
तिला आजही हवेत उडणाऱ्या पतंगाकडे पाहून आठवतो आपला पहिला प्रेमपत्र,
तिला आजही एखाद्या शब्दावर रडावंसं वाटतं, पण ती स्वतःला सावरते,  कारण "ती कमजोर नाही."

ती आई म्हणून झोपत नाही, पण तिच्या मनात अजूनही एक मुलगी लपलेली असते, 
जिला कुणीतरी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवावा असं वाटतं.
जिला तिच्या कष्टाचं कौतुक हवं असतं,  मोठं काही नाही, फक्त एक "तू खूप छान करतेस" हेच पुरेसं असतं.

ती समजून घेणाऱ्याला मन देऊन टाकते,
तिचं हसणं ज्याला खऱ्या अर्थाने दिसतं, त्याच्यासाठी ती तिचं सर्वस्व उधळून देते...
पण एकदा का ती मनाने तुटली, तर पुन्हा जुळत नाही,  कारण स्त्रीचं प्रेम हे पाण्यासारखं नसतं, ते संस्कारांसारखं खोलवर रुजलेलं असतं.

ती प्रत्येक नातं निभावते,  पण स्वतःसाठी जरा वेळ कुणी देईल, तर ती परत 'ती' होऊ शकेल.
ती हळवी आहे, पण नाजूक नाही. ती सुंदर आहे,  केवळ चेहऱ्यानं नव्हे, तर मनानं.

आजचा लेख मी त्या प्रत्येक स्त्रीसाठी लिहिलाय, 
जी स्वतःला विसरते, पण इतरांना जपते.
जी रडते एकटीने, पण हसते सर्वांसोबत.
जी प्रेम करते न बोलता, पण मनातलं संपूर्ण देते.

*ती आहे... कारण जग आहे!*

सुनिल पुणे,TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 
(स्त्रीच्या मनाचा एक नम्र, प्रेमळ प्रणाम करणारा)

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"