गुलाबजाम आणि शुगर – एक सकारात्मक विचार

*गुलाबजाम आणि शुगर – एक सकारात्मक विचार*
लेखक – सुनिल पुणे TM 9359850065

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी टीका, मत्सर, किंवा तिरस्काराचा सामना करावा लागतो. काही लोक आपल्याला न आवडणं हे त्यांच्या वृत्तीचं प्रतिबिंब असतं, आपल्या किंमतीचं नव्हे. अशा वेळी आपण आपलं मन शांत ठेवून, स्वतःवरचा विश्वास न ढळू देता, पुढे जाणं अत्यंत गरजेचं असतं.

म्हणूनच मी एक विचार करत जगतो – “आपण गुलाबजाम आहोत आणि आपला तिरस्कार करणाऱ्याला शुगर आहे.”
काय सुंदर विचार आहे ना! गुलाबजाम हा गोड, मऊ आणि मनाला सुखावणारा असतो. पण शुगर असलेल्या माणसाला तो खाल्ला तरी त्रास होतो. त्याने गुलाबजामचा तिरस्कार केला, तरी त्याचं दोष आपल्यात नाही, तर त्याच्या शरीराच्या मर्यादेत आहे.

हा विचार आपल्याला शिकवतो की, आपण आपली गोडी, आपली किंमत, आपलं प्रेमळपण टिकवून ठेवलं पाहिजे. कोणी आपल्याला नाकारलं, दूर ठेवलं, तर ते त्यांच्या क्षमतेचा किंवा समजुतीचा प्रश्न आहे – आपल्या गुणांचा नाही.

जीवनात कायम सकारात्मक रहा. गुलाबजामसारखी आपली आत्मगुणांची गोडी अशीच राहू द्या – ती ज्या मनाला पचेल, त्या मनातच घर करेल.

सुनिल पुणे TM 9359850065.
topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?