समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती
*समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती* सुनिल पुणे TM 8007939423 समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक व भक्ती-मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या वाङ्मयातून भक्ती, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा दिव्य संदेश दिला. त्यांच्या ग्रंथांमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, विविध स्तोत्रे, अभंग व आरत्या प्रसिद्ध आहेत. गणपतीबाबत त्यांनी रचलेली सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे, *"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची"* ही आरती आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरही गणेशोत्सवात, मंदिरात आणि घराघरांत रोज भक्तिभावाने गायली जाते. मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरेगाव (अष्टविनायक पैकी पहिले स्थान) येथे आहे. परंपरेनुसार, समर्थ रामदास स्वामी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत होते, तेव्हा त्यांनी मोरेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्या वेळी गणपतीच्या महतीचे स्मरण करून त्यांनी "सुखकर्ता दुःखहर्ता" ही आरती येथेच रचली होती, यामध्ये गणपतीला "सुखकर्ता" म्हणजे सुख, आनंद देणारा आणि "दुःखहर्ता" म्हणजे संकट व दुःख दूर करणारा देव म्हणून गौरविले आहे. आरतीत विघ्नहर्ता, मंग...