कृष्ण पाठीशी हवा...
कृष्ण पाठीशी हवा...
....सुनिल पुणे TM 8007939422
राधेच्या स्वरांत तो, अर्जुनाच्या श्वासात,
कधी प्रेमाच्या गाण्यात, कधी रणांगणाच्या तासात.
राधा त्याची नव्हती, अर्जुनाचे यश नव्हते,
तरी नाती निभावताना स्वार्थ कधीच नव्हते.
बासरीच्या सुरांत प्रेम, गीतामृतात उपदेश,
सुदर्शनाच्या फिरण्यातही तो करायचा रक्षण विशेष.
हळुवार बोटांनी सूर, कधी चक्राची गती,
कृष्णात होती प्रेमळता, आणि रणाची निती.
नात्यांत निरपेक्ष, मार्गात तो स्थिर,
कधी मित्र, कधी गुरु, कधी रणधुरंधर.
सुनिल म्हणतो जीवनात, कितीही वादळं आली,
कृष्ण पाठीशी असेल तर, प्रत्येक वेदना टळली.
प्रेमात तो हृदयाचा स्वर, युद्धात विजयाचा दीप,
कृष्णाशिवाय जीवन सारे, अपूर्ण, अधुरं, अती क्षीण.
म्हणूनच एकच हाक
"सुनिलच्या आयुष्यातही कृष्ण पाठीशी हवा...!"
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment