वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...

वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...सुनिल पुणेTM 9359850065

माणसाचं वय जसजसं पुढे सरकतं, तसं प्रेमाचं रूपही बदलतं. तरुणपणी आपण डोळ्यांच्या चमकात, चेहऱ्याच्या तेजात, शरीराच्या आकर्षणात प्रेम शोधत असतो. पण आयुष्याचे ऋतू बदलले की हे आकर्षण मागे राहतं, आणि मनाची इच्छा वेगळीच होत जाते, आपल्याला हवं असतं कोणीतरी आपल्या शेजारी, पाठीमागे शांतपणे उभं राहावं, आपल्या थकलेल्या मनाला आधार द्यावा, आणि आपल्या अस्तित्वाला समजून घ्यावं.

तरुणाईचं प्रेम म्हणजे एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखं  ताजं, रंगीबेरंगी, हलकंफुलकं. पण वर्षे सरली की तेच प्रेम एका जुना वटवृक्षासारखं होतं  जाते, जिथं सावली मिळते, जिथं सुरक्षितता मिळते, आणि जिथं भूतकाळाच्या गोड आठवणी आणि भविष्याच्या चिंता दोन्हीही  संपतात आणि या टप्प्यावर प्रेमाचं सौंदर्य हे चेहऱ्याच्या गुळगुळीतपणात नसून, डोळ्यांत दिसणाऱ्या विश्वासात असतं. हसरा चेहरा सुरकुतला तरी, प्रियकराच्या दृष्टीत तोच पहिल्यासारखा सुंदर वाटत असतो.

वय वाढलं की नात्याचं मोजमाप सुरू होते "तू माझ्यासाठी काय आणतोस" यात नसून "तू माझ्यासोबत आहेस का" यात होतं.
हे प्रेम म्हणजे पावसाळ्यात खिडकीजवळ बसून एकत्र चहा पिणं,... थंड रात्री एका पांघरुणात निवांत गप्पा मारणं,....उन्हाळ्यात एकमेकांना सावली देणं. ...हे साधे वाटणारे हे क्षणं खऱ्या प्रेमाची मौल्यवान व्याख्या होत जातात.

शेवटपर्यंत टिकणारं नातं म्हणजेच, त्वचा सुरकुतते, केस पांढरे होतात, पावलं मंदावतात… पण माणसाची गरज कधीच बदलत नाही.
आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुणीतरी आपल असावं असं वाटतं, 
जे न बोललेलं मनातलं वाचेल,
जे डोळ्यांतली पोकळी भरून काढेल,
जे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत "मी तुझ्यासोबत आहे" असं सांगेल.

अशा प्रकारे प्रेम हे तरुणपणातील मोहापुरतं मर्यादित राहत नाही. ते काळाबरोबर बदलतं, अधिक खोल होतं, आणि शेवटी जीवनाच्या शेवटच्या वळणापर्यंत टिकणारं नातं बनतं.

चला प्रेम करूयात...प्रेमातच जगु यात. अंतापर्यंत!

लेखक..सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?