सरळ बांबू आधीच कापतात… तसेच चांगले वागणार्या माणसांचे ही होत
"सरळ बांबू आधीच कापतात… तसेच चांगले वागणार्या माणसांचे ही होत"
लेखक सुनिल पुणेTM 8007939422
तिच्या डोळ्यांत एक वेगळंच तेजोमय मिश्रण होतं, आठवणींचं ओलसर पाणी आणि मनात साठलेली खंत. ती म्हणाली,
"मला नेहमी वाटायचं, आपण मनापासून, चांगुलपणाने सर्वांशी वागलो की जगही आपल्याशी तसंच वागेल. लोक म्हणतात ना, ‘जग आपल्याला तसंच परत देतं, जसं आपण देतो.’ पण खरी गोष्ट काय आहे, माहिती आहे का? आपण जेवढं चांगलं वागतो, तेवढाच आपला गैरफायदा घेतला जातो. जणू कधी ही सरळ बांबू आधीच कापला जातो, वाकडा राहतो तो वाचतो."
तिचं हे बोलणं ऐकताच मनात एक टोचणी लागली. आयुष्यात कित्येक वेळा आपणही असं अनुभवलेलं असतं. कोणाला मनापासून आर्थिक व इतर मदत केली, त्यांचा विचार करून स्वतःचं नुकसान ही सहन केलं, आणि शेवटी परत काय मिळालं? तर फक्त विसरले जाणं… कधी कधी तर पाठीमागे निंदा नालस्ती व वाईट बोलली जाणारी चुकीची वाक्यंही असतात..
चांगुलपणा हा दोष नसतो, पण त्याला कवच लागतं ते अनुभवाचं. ज्यांच्यासाठी आपण झिजतो, त्यांची खरी ओळख वेळेनेच करून दिली पाहिजे. कारण जगात सगळेच लोक आपल्या मनासारखे नसतात; काही केवळ आपल्या सरळपणावर डोळा ठेवून बसतात, हेच खरय....!
ती शेवटी शांतपणे म्हणाली,
"मी आता वाईट होणार नाही, पण चांगली होतानाच थोडी शहाणी होणार आहे. सरळ बांबू राहीन, पण कापणाऱ्यांच्या कुऱ्हाडीला हात लावू देणार नाही."
कदाचित हाच तिच्या खंतांचा निष्कर्ष होता. चांगुलपणा जपायचा, पण त्याच्या भोवती स्वतःच्या सन्मानाचं कुंपण घालायचं.
सुनिल पूणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment