लघुकथा

*लघुकथा* 
आज मी जरा वेगळाच कथा प्रपंच करतोय, नक्की वाचा, आवडले तर अभिप्राय सर्वानीच द्यावा, कारण सर्वासाठी लघुकथा आहेत.
सुनिल पुणेTM 8007939422

भाऊ–बहीण
१. लहानपणी भांडण झाल्यावर मी बहिण रुसवून बसत असे. आज ती माहेरी आली तेव्हा तिचा मुलगा माझ्या मांडीवर बसला. बहिणीच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली, “तुझ्याशी रुसणं आता कुठे जमणार रे?”

२. रक्षाबंधनाला मी तिला विचारलं, “या धाग्याचं एवढं महत्त्व का?” ती हसली, “हा धागा नाही रे, हे आईबाबांचं हृदय आपल्यामध्ये गुंडाळलेलं आहे.”

प्रेमी–प्रेमिका
३. ती म्हणाली, “तू खूप बदललास रे.” मी हसत म्हणालो, “तुझ्या प्रत्येक स्वप्नाशी जुळण्यासाठी रोज बदलत असतो ग.”

४. पावसात चालताना तिने विचारलं, “आपण कायम असंच एकत्र राहू ना ?” मी तिचा हात घट्ट धरला आणि पावसाचा आवाज थांबेपर्यंत उत्तर दिलंच नाही… कारण कधी कधी मौन च सर्वात मोठं ‘हो’ असतं.

मित्र–मैत्रीण
५. कॉलेजचा जुन्या मित्राला प्रथमच भेटलो. त्याने पहिलाच प्रश्न विचारला, “आठवतोस का तो अपूर्ण जोक?” आणि पुढची एक तासभराची हसण्याची मैफल जणू सगळे वर्षांचे अंतर पुसून गेली.

६. ती म्हणाली, “आता आपण बोलत नाही तितकं पुर्वीसारख.” मी हसून म्हणालो, “मैत्रीला मेसेज डिलिव्हरी रिपोर्ट लागत नाही, ती मनात ऑनलाइन असतेच ग.”


पती–पत्नी
७. पत्नीने विचारलं, “लग्नाला २५ वर्षे झाली तरी तू मला फुलं का देतोस?” मी म्हणालो, “फुलं सुकतात, पण तुझं हसू नाही… तेच जिवंत ठेवण्यासाठी.”

८. तीने रागावून बोलणं बंद केल होत. मी स्वयंपाकघरात तिच्या आवडीचा चहा बनवला. ती हसत म्हणाली, “तू गप्पांत हरलास.” मी मनात म्हटलं, “नातं मी जिंकलो.”

डिजिटल युग
९. व्हिडिओ कॉलवर आई म्हणाली, “तुझा चेहरा तर दिसतोय, पण मिठी नाही मारता येत रे बाळा.” तेव्हा समजलो, तंत्रज्ञान फक्त नात्यांचा आवाज वाढवू शकतं, ऊब नाही.

१०. सोशल मीडियावर तिचं ‘लास्ट सीन’ दिसलं नाही म्हणून मी काळजीत पडलो. नंतर समजलो, ती माझ्यासोबत समोरासमोरच गप्पा मारत होती.

११. मित्र म्हणाला, “स्टेटसवर टाकलं होतं, बघितलंस का?” मी उत्तर दिलं, “तुझ्या डोळ्यांत जे लिहिलं आहे, ते कुठल्याही स्टेटसपेक्षा सुंदर आहे रे.”

१२. रात्री उशिरा तिने मेसेज केला, “ऑनलाईन आहेस?” मी उत्तर दिलं, “तुझ्यासाठी तर कायम ‘ऑन’ आहे.”

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments