ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422
ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422
आजच्या काळात एक गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आहे की,
“ॲल्लोपॅथी आणि आयुर्वेद यापैकी खरे कोण?”
आपण ज्या भारतभूमीत जन्मलो, तिथे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी आयुर्वेद ही महान वैद्यकीय परंपरा दिली. आयुर्वेदात रोग मुळाशी जाऊन त्यावर उपाय करण्याची ताकद आहे. आहार, विहार, पंचकर्म, औषधी वनस्पती या सर्वांचा समन्वय करून शरीर-मन-आत्मा या तिन्हींचा समतोल साधण्यावर भर आहे.
परंतु आज आपण पाहतो की जगभरात आणि विशेषतः भारतात फक्त ॲल्लोपॅथी हॉस्पिटल्स, औषधनिर्मिती कंपन्या, मेडिकल्स आणि सर्जरी सेंटर्स प्रचंड वेगाने वाढले आहेत. कारण सोपे आहे, ॲल्लोपॅथी ही ‘रुग्णसेवेपेक्षा इंडस्ट्री’ म्हणून उभी राहिली आहे.
काही माझे निरीक्षणे व प्रश्न
का ? प्रत्येक शहरात नवनवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभे राहतात?
का ? एखाद्या साध्या आजारासाठीही महागडी तपासणी (MRI, CT Scan, Sonography) आवश्यक केली जाते?
का ? औषधे घेतली तरी रोग मुळापासून नाहीसा होत नाही?
का ? दरवर्षी नवीन-नवीन रोग जन्म घेत आहेत ?
का लोक सर्जरीपर्यंत पोहोचतात, पण त्या आधीचे सोपे उपाय दुर्लक्षित का राहतात?
यावर अभ्यासक व काही आयुर्वेदिक डॉक्टर्स सांगतात की, यामागे एक मोठी लॉबी कार्यरत आहे.
डॉक्टर्स, हॉस्पिटल व्यवस्थापन, औषध उत्पादक कंपन्या आणि विमा कंपन्या.
ॲल्लोपॅथीची ताकद आणि मर्यादा
ॲल्लोपॅथीचा सर्वात मोठा उपयोग सर्जरी आणि आपत्कालीन उपचारात आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका, अवघड शस्त्रक्रिया यात ॲल्लोपॅथी अनमोल ठरते. पण साध्या सर्दी-खोकल्यापासून ते डायबेटीस, बीपी, थायरॉईड, मायग्रेन, मानसिक ताण असे रोग आयुष्यभर औषधावर टिकवून ठेवतात. रोग मुळाशी जाण्याऐवजी फक्त लक्षणे दाबली जातात.
आयुर्वेद हे जीवनशैलीवर आधारित उपचार पध्दती आहे...आयुर्वेद काय सांगतो “रोगाच्या मुळाशी जा, शरीराच्या दोषांचा समतोल साधा.”
आहारातील शुद्धता, ऋतुचर्या, दिनचर्या, योगासन, ध्यान, पंचकर्म आणि औषधी वनस्पती यांच्या साह्याने शरीर नैसर्गिकरीत्या बरे होते. दुष्परिणाम जवळजवळ नाहीत. रोग पुन्हा उद्भवू नये यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढवली जाते.
ॲल्लोपॅथी ही आज पैशांची इंडस्ट्री झाली...जसे
एक MBBS, MD, MS डॉक्टर घडण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात. मग तो डॉक्टर झाल्यावर प्रथम “रुग्णसेवा” करील की आपल्या शिक्षणावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये परत काढील?
हॉस्पिटल्स आणि औषध कंपन्यांची युती याच कारणासाठी आहे “रुग्ण बरा होऊ नये, तो आयुष्यभर ग्राहक राहावा.”
सत्य कुठे आहे? खरं पाहता आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यासारख्या पद्धती रोग मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. ॲल्लोपॅथी मात्र जलद परिणाम दाखवते पण दीर्घकालीन गुलामगिरी निर्माण करते. म्हणूनच आज जगात लाखो लोक परत नैसर्गिक औषधोपचाराकडे वळत आहेत.
आज आवश्यक आहे ती संयुक्त दृष्टिकोनाची.
आपत्कालीन परिस्थितीत ॲल्लोपॅथी अमूल्य आहे. पण जीवनशैलीजन्य, दीर्घकालीन रोगांवर आयुर्वेद व इतर नैसर्गिक उपचार खरे समाधान देतात...समाजाने ॲल्लोपॅथीच्या “इंडस्ट्रीकरणा” कडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
“रोग टाळणे हाच खरा उपाय. रोग झाला तर औषध घेण्याआधी जीवनशैली बदला, आहार शुद्ध ठेवा, आणि आयुर्वेदाचा स्वीकार करा.”
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment