"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील बलात्कार

"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील  बलात्कार

लेखक  सुनिल पुणे TM 8007939422

"मी एक स्त्री आहे... माझं स्वतःचं मन आहे, विचार आहेत, स्वप्नं आहेत. पण हे सगळं जगाला दिसतच नाही. रस्त्यावर पाऊल टाकताच मला आधी जाणवतात त्या नजरा… ज्या माझ्या डोळ्यांना भिडत नाहीत, पण माझ्या शरीरावरून घसरत राहतात.

हो, रोजचा बलात्कार मी सहन करते,  शब्दांनी नाही, हातांनी नाही, पण नजरेने. एखादी टवाळटवाळ टिप्पणी, एखादा शिट्टीचा आवाज, किंवा एखादी घाणेरडी नजर मला आतून कितीदा मारते हे कुणालाच कळत नाही.

मी घराबाहेर निघताना माझ्या वेशभूषेबद्दल, चालण्याबद्दल, बोलण्याबद्दल विचार करते. का? कारण मला माझ्या सुरक्षेबद्दल काळजी असते. पण खरं तर मला नाही बदलायचं, बदलायला हवेत त्या नजरांना, त्या विचारांना.

शारीरिक अत्याचार एकदाच होतो आणि त्याच्या जखमा दिसतात. पण नजरेचा बलात्कार रोज होतो, शेकडो वेळा होतो आणि त्या जखमा कुणालाच दिसत नाहीत,  कारण त्या आत खोलवर उमटतात...मला हवं आहे तेवढंच माझ्या अस्तित्वाकडे बघा, माझ्या क्षमतेकडे बघा, माझ्या विचारांकडे बघा. मी केवळ शरीर नाही. मी आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पत्नी आहे… पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मी एक स्वतंत्र माणूस आहे.

नजरेला संस्कारांची गरज आहे. विचारांना माणुसकीची गरज आहे. कायदे आहेतच, पण त्याहीपेक्षा मोठी जबाबदारी प्रत्येकाच्या मनावर आहे,  स्त्रीला आदराने बघण्याची.

समाज बदलायचा असेल, तर सुरुवात इथूनच झाली पाहिजे 
नजरेने होणारा बलात्कार थांबवू या.
तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकू  ‘हो, आपण सुसंस्कृत आहोत.’

लेखक "सुनिल पुणे TM" 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?