"संसार, प्रेम आणि संस्कार: एका स्त्रीच्या अंतर्मनाची खरी व आपबिती कहाणी"

"संसार, प्रेम आणि संस्कार: एका स्त्रीच्या अंतर्मनाची खरी व आपबिती कहाणी"
 लेखक सुनिल पुणे TM 8007939422

ती एक सामान्य स्त्री आहे.
पण तिचं मन? एक अश्रूंनी भरलेलं समुद्र! लग्न झालं...ते मोठ्या अपेक्षांनी, नव्या स्वप्नांनी. पण लवकरच स्वप्नांची राख झाली. तिचा पती, जो तिच्या सुखदुःखाचा सोबती व्हावा पण तोच तिचा संसार नुसता जबाबदारी बनवून बसला. प्रेम, जिव्हाळा, संवाद सगळं हरवून गेलं. ती फक्त "एक पत्नी" म्हणूनच उरली नाही... तर एक मोलकरीण, एक यंत्र, एक बिनआवाजी सावली झाली...ती कोणाला सांगू शकत नाही... कारण समाज ऐकतो, पण समजून घेत नाही...आई-वडिलांना त्रास नको, मुलांचं भविष्य धोक्यात नको… आणि वरून ‘समाज काय म्हणेल?’ ह्या एकाच प्रश्नाने तिची जीभ कायमची गप्प!

आज ती जगते पण स्वतःसाठी नाही. संसारासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, आणि ‘स्त्रीधर्मा’साठी. मुलं झाली, थोडं समाधान मिळालं... पण तरीही मनामधील उपासमार कायम राहिली.
दिवस सरत गेले, आणि हळूहळू ती स्वतःलाच विसरली....आणि एक दिवस, अचानक तिच्या आयुष्यात तो आला. एक अनोळखी पण जिव्हाळ्याचा हात.
कोणतंही मागणं न करता, तिला फक्त "तिच्या" नावाने ओळखणारा.
त्या अनोख्या प्रेमात एक अनामिक व शांततादायक माया होती...जी गेल्या अनेक वर्षांत तिला मिळालेलीच नव्हती...ती गोंधळली... मन म्हणत होतं की  "हीच ती भावना, जी मी इतकी वर्षे ती शोधत होते का !"
पण मग मनात दुसरी बाजू बोलू लागते  "मी विवाहित आहे, आई आहे, समाज आहे...!"
या नव्या प्रेमाला ती नाव कसं,  काय  देणार?
काय म्हणतील लोक?
हे नातं स्वीकारलं तर ती ‘दोषी’ ठरेल, आणि नकार दिला तर स्वतःला ‘फसवलेली’ ठरेल.

या द्विधा मनस्थितीत ती तुटते... पण मोडत नाही.

ती त्या माणसाचं प्रेम नाकारत नाही, पण स्वीकारतही नाही.
ती स्वतःशी एक शपथ घेते 
"आता मी फक्त जगणार आहे, पण माझ्या मनासाठी.
माझ्या अस्तित्वासाठी.
माझ्या आत्म्यासाठी."

ती संसारात राहते फक्त मुलांसाठी. पण स्वतःच्या स्वाभिमानासाठी, ती आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करते.
शिकते, कमवते, स्वतःला ओळखते. नव्या प्रेमात न विसर्जन करते, ना च त्याच्याशी लग्न करते... पण त्या नात्याचं पावित्र्य जपते 
ते नातं तिला "आपण अजूनही जिवंत आहोत," हे सतत आठवतं ठेवतं.

स्त्री म्हणजे फक्त त्याग नव्हे, ती प्रेमही आहे.
ती माया आहे, पण मूक गुलाम नव्हे.
तिला संसार जपायचा असतो,   पण स्वतःलाही विसरायचं पण नसतं.

हे लेखन त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आयुष्यभर "घरासाठी" जगते, पण कधी स्वतःसाठी जगायला विसरते.

जग बदलेल कदाचित हळूहळू...
पण स्त्रियांनी स्वतःला ओळखणं, हीच खरी सुरुवात आहे नव्या प्रकाशाची...!

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com 

(हा लेख शेअर करताना माझे नाव असने आवश्यक आहे. स्त्रीच्या मनाला भिडणारा हा लेख तुमच्या ग्रुपमध्ये नक्की पाठवा.)

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?