सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..!

सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..!
सुनिल पुणेTM 8007939422

आजकाल सोशल मीडियावर लगेच स्त्री पुरूष ओळख वा प्रेम जुळतं ? म्हणजे! पण खरं सांगू का? हे “प्रेम” म्हणजे काय तर  “हाय, हेलो, गुड मॉर्निंग” पासून सुरू होतं, आणि दोन दिवसात मग थेट  “जरा पैसे पाठव ना, अडचण आहे” इथपर्यंत पोचतं. आणि नाही पाठवलं तर नातं संपलं. एवढंच ते ओळख प्रेम.

आणि जर पुरुषाने फक्त शरीरसुखासाठी स्त्रीबरोबर नातं केलं, तर तो “खलनायक” ठरतो. पण बाईने जर फक्त पैशासाठी नातं केलं, तर ती “त्यागमूर्ती” ? पण तस नाही हो! दोन्ही सारखेच चुकीचे आहे. मैत्री वा प्रेम म्हटलं की त्यात आदर आणि विश्वास हवाच. बाकीचा “स्वार्थ” म्हणजे थेट कचऱ्याच्या बादलीत टाकायच्या वस्तू सारखेच होईल.

पण पुण्यात आम्ही थोडक्यात सांगतो की..
 “खर्‍या प्रेमात शरीराचं आकर्षण चालतं, पैशाचं लोभ लगेच चालत नाही.”
 “गोड बोलणाऱ्यांपासून जपून रहा, कारण गोड बोलणं म्हणजे सर्वच बिलकुल फुकटात मिळेल अस नाही.”

आजच्या सोशल मीडियावरची ९०% नाती ही “फुकटात सुख, लगेच उधारीत खर्च” या धर्तीवर चालतात. आणि मग पुढे काय होतं? बातमी व चर्चा   होते “तरुणाला पन्नास हजारांचा गंडा” किंवा “प्रेमाच्या नावाखाली स्त्रीकडे शरीरसुखाची मागणी”.

पण, हो! सगळंच खोट नात, प्रेम,  मैत्री असं नसते. पण काही नाती इथे खूप सुंदर जुळतात. त्यात भांडणं होतात, अबोला होतो, “तू ऑनलाईन होतास तरी रिप्लाय नाही केला” अशा ड्रामे होतात… पण तरी शेवटी आदर आणि विश्वास असतो. अशा नात्यांवरच सोशल मीडियावरची खरी शोभा आहे.

म्हणूनच, एक पुणेरी नियम लक्षात ठेवा...“प्रेम सोशल मीडियावर जुळतं, पण शहाणपण डोक्यात असलं पाहिजे.”...“नावापुरतं प्रेम आणि स्वार्थापुरती मैत्री,  दोन्हीला ब्लॉक मारायलाच पाहिजे.”

थोडक्यात, सोशल मीडियावर नातं जुळलं तर ठिक… पण नात्याचा पाया आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर असेल, तरच ते टिकणार. नाहीतर प्रेम नुसतं “डेटा पॅक संपेपर्यंतचं” राहणार!

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...